Bank Holiday Jan 2026: 24 ते 27 जानेवारीपर्यंत बँका बंद राहणार की सुरु? प्रत्येक शनिवारी बँकांना सुट्टी? वाचा

पुढील काळात बँका फक्त 5 दिवसच चालू राहणार का? प्रत्येक शनिवारीही बँक बंद राहणार का? अशा प्रश्नांची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Bank Holidays In January 2026
मुंबई:

Bank holidays in India 2026 : पुढील काळात बँका फक्त 5 दिवसच चालू राहणार का? प्रत्येक शनिवारीही बँक बंद राहणार का? अशा प्रश्नांची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. कारण देशभरातील बँक कर्मचाऱ्यांच्या मोठ्या मागण्या आणि 27 तारखेला होणाऱ्या आंदोलनामुळे या आठवड्यात सलग अनेक दिवस बँका बंद राहण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे ग्राहकांना याबाबत आधीच माहिती करून घेणे अत्यंत गरजेचे आहे.

5 दिवसांच्या वर्किंगसाठी देशव्यापी आंदोलनाची घोषणा 

देशभरातील बँक कर्मचारी संघटना आठवड्यात 5 दिवस काम आणि सर्व शनिवारी सुट्टी या मागणीवरल अनेक दिवसांपासून ठाम आहेत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) चं म्हणणं आहे की, मार्च 2024 मधील वेतन कराराच्या वेळी या मागण्यांबाबत सहमती दर्शवण्यात आली होती. परंतु, त्या अजूनही अमलात आणल्या गेल्या नाहीयत.या मागणीसाठीच 27 जानेवारी 2026 रोजी देशव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे.

24 ते 27 जानेवारीपर्यंत सलग चार दिवस बँका बंद

27 जानेवारीला आंदोलन करण्याची घोषणा अशासाठी करण्यात आली आहे की, त्या आधी आणि नंतर बँक सुट्ट्या आहेत. 24 जानेवारी हा महिन्याचा चौथा शनिवार,25 जानेवारी रविवारी सुट्टी आणि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सुट्टी आहे. अशा परिस्थितीत,जर आंदोलन झालं तर काही ठिकाणी 24 ते 27 जानेवारीपर्यंत सलग चार दिवस बँका बंद राहू शकतात. म्हणजेच,गणतंत्र दिनाच्या निमित्ताने या काळात तुम्ही लाँग वीकेंडची योजना करू शकता.23 जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती आणि सरस्वती पूजेच्या कारणाने कोलकाता,भुवनेश्वर,अगरतला आणि चेन्नई येथे बँका बंद राहतील.

नक्की वाचा >> उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! मुंबईतील प्रसिद्ध महिला नगरसेवक शिंदें गटाच्या गळाला, सेना भवनात काय घडलं?

  • 24 जानेवारी हा चौथा शनिवार असल्यामुळे संपूर्ण देशात बँका बंद राहतील.
  • 25 जानेवारी हा रविवार असल्याने साप्ताहिक सुट्टी असेल.
  • 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी देशभरातील बँका बंद राहतील.

डिजिटल बँकिंग सुरू राहील,पण काही कामे अडकू शकतात. आंदोलन आणि सुट्ट्यांच्या काळात मोबाईल बँकिंग,इंटरनेट बँकिंग आणि एटीएम सेवा नियमितपणे सुरू राहतील.

Advertisement

बँक शाखेशी संबंधित कामे 

  1. रोख रक्कम जमा करणे
  2. चेक क्लियर करणे
  3. डिमांड ड्राफ्ट बनवून घेणे
  4. समोरासमोर जाऊन तक्रार नोंदवणे

ही कामे बाधित होऊ शकतात.सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये या परिणामाचा प्रभाव अधिक दिसू शकतो.

नक्की वाचा >> Car Safety Tips कार पाण्यात पडल्यावर काय करावं? बुडण्याआधीच 'या' 6 गोष्टी तातडीनं करा, तुमचा जीवही वाचू शकतो

सोशल मीडियावरही वाढली "5 डे बँकिंग"ची मागणी

आंदोलनापूर्वी बँक संघटनांनी सोशल मीडियावरही या मोहिमेबाबत आवाज उठवला आहे.  #Implement5DayBanking या हॅशटॅगद्वारे लाखो पोस्ट करण्यात आल्या असून हा संदेश कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचला आहे. संघटनांचं म्हणणं आहे की, लोकांचा प्रतिसाद खूप सकारात्मक आहे आणि सर्व कर्मचाऱ्यांना आंदोलनात पूर्ण सहभाग घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

2026 मध्ये 100 पेक्षा जास्त दिवस बँका बंद

RBI च्या Bank Holiday List 2026 नुसार, वर्षभरात देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये 100 पेक्षा जास्त दिवस बँका बंद राहणार आहेत.

या सुट्ट्यांमध्ये 

प्रजासत्ताक दिन

होळी

स्वातंत्र्य दिन

गांधी जयंती

दसरा

दुर्गा पूजा

दिवाळी

अनेक राज्यस्तरीय सणांचा समावेश आहे. प्रत्येक राज्यात सुट्ट्या वेगवेगळ्या असल्याने ग्राहकांनी आपल्या राज्याची हॉलिडे लिस्ट पाहणे अत्यावश्यक आहे.

खरंच लागू होईल का 5 डे बँकिंग सिस्टम?

सध्या सरकार किंवा RBI कडून 5-दिवसीय बँकिंगबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु, युनियन सातत्याने दबाव टाकत असल्याने हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.  लवकरच या विषयावर स्पष्ट निर्णय घेण्यात येईल,असं अनेकांना वाटतंय. जर तुम्ही एखादे महत्त्वाचे बँक काम पुढील काही दिवसांत करण्याचा विचार करत असाल, तर या आठवड्यात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सलग सुट्ट्या आणि आंदोलन यामुळे बँक शाखेत प्रत्यक्ष जाऊन काम करणे कठीण होऊ शकते. त्यामुळे आवश्यक काम आधीच उरकून घ्या. शक्य तितका डिजिटल बँकिंगचा वापर करा. UPI, नेटबँकिंग, मोबाईल बँकिंग आणि एटीएम सेवा सुरू राहतील. 

Advertisement