सायबर गुन्हा घडल्यास ऑनलाईन तक्रार करता येते? वाचा, तक्रार करण्यासाठीचा सोपा मार्ग

मोबाईल तसेच माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर अधिक वाढल्याने सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

आपल्या सोबत सायबर गुन्हा घडल्यास काय करायचं हे अनेकदा कळत नाही. आपण घाबरलेलो असतो आणि आपल्या जवळचे सायबर पोलीस स्टेशन कोणते आहे हे कळत नाही. अशावेळी तक्रार कशी करायची आणि कोणाकडे करायची असा प्रश्न निर्माण होतो. माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर अधिक वाढल्याने सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. सायबर गुन्हे रोखण्यासाठी अशा गुन्ह्यांबाबत जागरुकता वाढविणे आवश्यक आहे. यामुळे जर सायबर गुन्हा गडला असल्यास त्याबद्दलची तक्रार करणे अगदी सोपे आहे. कसे ते आपण पाहूया. 

सध्या देशामध्ये मोबाईल फोन तसेच माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ झाली आहे. त्या अनुषंगाने सायबर गुन्ह्यांबाबत जागरुकता ही बचावाची प्रथम पायरी असल्याने, केंद्र शासनाच्या गृह विभागांतर्गत असलेल्या भारतीय सायबर क्राईम समन्वय केंद्राने (इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर - I4C) सायबर गुन्हेगारीबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढविण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेतला आहे. कोणत्याही आर्थिक सायबर गुन्ह्याच्या तक्रारीची नोंद करण्यासाठी तत्काळ नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाइन नंबर 1930 वर कॉल करावा अथवा www.cybercrime.gov.in  या नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर नोंदणी करावी.सायबर क्राइमबाबत ताज्या घडामोडींच्या माहितीसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सायबर दोस्त (Cyberdost) या अधिकृत सोशल मीडिया हँडलला फॉलो करण्याचे आवाहन गृह विभागामार्फत करण्यात आले आहे.

Advertisement

‘सायबर दोस्त'ला पुढील लिंकवर क्लिक करुन फॉलो करु शकता –

https://x.com/Cyberdost

https://www.facebook.com/CyberDostI4C

https://www.instagram.com/cyberdosti4c