HSRP Number plate: '...तर मंत्री, आमदार, खासदारांच्या गाड्यांवर ही कारवाई होणार', परिवहन मंत्र्यांचा थेट इशारा

सर्वांसाठी HSRP नंबर प्लेट बंधनकारक आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कोणतीही सवलत दिली जाणार नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins
मीरा रोड:

इरफान सय्यद

गाड्यांना HSRP नंबर प्लेट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी वारंवार मुदतवाढ ही देण्यात आली आहे. जर दिलेल्या मुदतीत  HSRP नंबर प्लेट लावली नाही तर कडक कारवाईचा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. ऐवढेच नाही तर ही नंबर प्लेट मंत्री, आमदार, खासदारांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या गाड्यांना बंधनकारक आहे. त्यांनी जर ती लावली नसेल तर त्यांच्यावर ही कारवाईचा बडगा उगारला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 31 डिसेंबरच्या आता ही नंबर प्लेट लावावी लागणार आहे. तोपर्यंत सध्या मुदतवाढ देण्यात आली आहे. 

हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) नसलेल्या वाहनांवर 31 डिसेंबरनंतर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. परिवहन विभागाच्या माहितीनुसार, गुन्हेगारी घटनांमध्ये साध्या नंबर प्लेट असलेल्या वाहनांचा गैरवापर होत आहे. त्यामुळे प्रत्येक वाहनावर HSRP नंबर प्लेट अनिवार्य करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल समजले जाते. त्यामुळेच HSRP नंबरप्लेट बंधनकारक  करण्यात आली आहे. 

Advertisement

नक्की वाचा - NCMC Card: 1 ऑगस्टची मुदत हुकली तरी काळजी नको! एसटीच्या 'या' निर्णयामुळे लाखो प्रवाशांची अडचण दूर

परिवहन मंत्र्यांनी सांगितले की, राज्यातील जुन्या वाहनांपैकी आतापर्यंत सुमारे एक कोटी वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसविण्यात आल्या आहेत. मात्र, जुन्या वाहनांपैकी केवळ 55 ते 56 टक्के वाहनधारकांनीच HSRP प्लेट बसविल्या आहेत. उर्वरित वाहनधारकांनी 31 डिसेंबरपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. सरनाईक यांनी स्पष्ट केले की, मंत्री, खासदार, आमदार किंवा इतर कोणतेही लोकप्रतिनिधी असोत, सर्वांसाठी HSRP नंबर प्लेट बंधनकारक आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कोणतीही सवलत दिली जाणार नाही.

नक्की वाचा - Viral Video: उघडी गँग! चोरीसाठी भन्नाट शक्कल, नग्न होत कपडेच बनवले आपले शस्त्र अन् टाकला दरोडा

दरम्यान, 31 डिसेंबरनंतर HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर नियमांनुसार कारवाई केली जाईल. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच लोकप्रतिनिधींच्या वाहनांवरही समान पद्धतीने कारवाई करण्यात येईल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. या आधी बऱ्याच वेळा HSRP नंबर प्लेट  बसवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. पण त्यानंतर ही अनेकांनी या नंबर प्लेट लावलेल्या नाहीत. शेवटी पुन्हा एकदा परिवहन विभागाला मुदतवाढ द्यावी लागली आहे.