स्पीकर ऑन करून मोबाईलवर बोलत असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण ही बातमी स्पिकर ऑन करून बोलणाऱ्यांसाठी आहे. स्पीकर ऑन करून मोबाईलवर बोलणं अब्दुल समद यांना महाग पडलं. अब्दुल यांचे अफरा कलेक्शन नावाचे लेडीज एम्पोरियमचे दुकान आहे. नांदेडच्या महमद अली रोड भागात हे दुकान आहे. ते दुकानात असताना मोबाईल फोनवर बोलत होते. त्यावेळी त्यांनी मोबाईल फोन स्पीकरवर ठेवला होता. बोलत असताना मोबाईलचा अचानक स्फोट झाला. त्यानंतर मोबाईलला आगही लागली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बोलत असताना अचानक मोबाईलचा स्फोट झाल्याने अब्दुल समद हे हादरून गेले. त्यांना क्षणभर काय झालं हे समजलंच नाही. मोबाईलचा स्फोट झाल्यानंतर मोबाईल त्यांच्यातून खाली पडला. हे त्यांचे नशिब समजावे. यात अब्दुल यांना कोणतीही इजा झाली नाही. पण अचानक झालेल्या याघटनेने ते घाबरलेय. मोबाईल खाली पडल्यानंतर त्याला आग लागली. त्यांच्याकडे सॅमसंग कंपनीचा मोबाईल होता. ओव्हर हीटमुळे मोबाईलचा स्फोट झाला असावा असा अंदाज आहे .
ट्रेंडिंग बातमी - वसंत मोरेंचं ठरलं! इंजिन सोडलं, रोड रोलरवर चढले,आता हाती मशाल घेणार
त्यामुळे मोबाईल ओव्हर हिट होवू नये याची सर्वांनीच काळजी घेतली पाहीजे. अब्दुल यांचे नशिब चांगले होते म्हणून मोठी दुर्घटना झाली नाही. शिवाय त्यांना कोणतीही इजाही झाली नाही. या आधीही मोबाईलचा असा स्फोट झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कधी मोबाईल चार्जींगला लावल्यानेही मोबाईलचा स्फोट झाल्याच्या या आधी घटना घटल्या आहेत. त्यामुळे मोबाईल वापरताना प्रत्येकाने काळजी घेण्याची शक्यता आहे.