Independence Day 2025: स्वातंत्र्य दिन असो की प्रजासत्ताक दिन असो या दिवशी सर्वांच्या कानावर हमखास पडणारं गीत म्हणजे ऐ मेरे वतन के लोगो. हे गाणं कवी प्रदीप यांनी लिहीलं आहे. पण हे गाणं कसं लिहीलं गेलं, त्यानंतर ते कुणी गायलं पाहीजे ते कसं ठरलं? गाण्याला संगीत कुणी दिलं? या मागे घडलेले अनेक किस्से आहेत. ते कदाचितच कुणाला माहित असतील. कवी प्रदीप यांची मुलगी मितूल प्रदीप यांनी या गाण्या मागचे अनेक किस्से NDTV मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले. यातील दोन किस्से हे फार खास आहेत. त्यात एक तर हे गाणं कवी प्रदीप यांनी कसं लिहीलं आणि हे गीत गाण्यावरून लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचे झालेलं भांडण. त्यावेळी नक्की काय घडलं होतं तेच आपण जाणून घेणार आहोत.
मितूल प्रदीप यांनी आपल्या मुलाखतीत या गीता मागच्या कहाण्या सांगितल्या आहेत. हे गीत लिहीण्या मागे एक पार्श्वभूमी होती. ती म्हणजे भारत चीन यांच्यात झालेलं युद्ध. या युद्धात भारताचे अनेक सैनिक शहीद झाले होते. या शहीदांसाठी गीत लिहावं असं त्यावेळी कवी प्रदीप यांना वाटत होतं. असेच ते एक दिवस माहिम परिसरात चालत होते. त्यावेळी त्यांना ऐ मेरे वतन के लोगो हे गाणं सुचलं. पण त्यावेळी त्यांच्याकडे कागद पेन नव्हता. त्यांनी तीथे असलेल्या एका पान टपरीवाल्या कागदाची मागणी केली. पण आपल्याकडे कागद नाही असं त्याने सांगितलं.पण आपल्याकडे मोकळं सिगारेटचं पाकीट आहे असं तो म्हणाला. तेच पाकीट कवी प्रदीप यांनी घेतलं. त्याच्याकडूनच त्यांनी पेनही घेतला. पुढे तिथेच त्यांनी या गीताच्या ओळी लिहील्या. नंतर घरी जावून संपूर्ण गाण त्यांनी लिहून काढलं. अशा पद्धतीने हे गीत तयार झाल्याचं मितूल यांनी सांगितलं.
नक्की वाचा - Independence Day 2025: यंदाचा स्वातंत्र्यदिन 78 वा आहे की 79 वा? दूर करा सगळ्या शंका
गाणं लिहून झाल्यानंतर हे गाणं लता मंगेशकर यांनी गावं अशी कवी प्रदीप यांची इच्छा होती असं ही मितूल यांनी सांगितलं. या गाण्याला सी. रामचंद्र म्हणजेच रामचंद्र चितळकर यांनी संगीत दिलं होतं. पण याच सी रामचंद्र आणि लता मंगेशकर यांच्या त्यावेळी काही मतभेद निर्माण झाले होते. त्यामुळे प्रदीप यांच्या पुढे मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्याच वेळी सी रामचंद्र यांनी आशा भोसले यांना हे गाणं गाणार का? अशी विचारणा केली होती. आशा भोसले यांनी ही लगेचच हे गीत गाण्याची तयारी दर्शवली. आपण हे गीत नक्की गाऊ असं आशा भोसले यांनी सी. रामचंद्र यांना सांगितलं.
स्वातंत्र्य दिनी कोणत्या जिल्ह्यात कोणता मंत्री ध्वजारोहण करणार?
त्याच वेळी दुसरीकडे कवी प्रदीप यांनी लता मंगेशकर यांना संपर्क केला. तुम्ही हे गाणं गावं अशी आपली इच्छा असल्याचं त्यांनी लता मंगेशकर यांना सांगितलं. त्यावर लता मंगेशकर यांनी आपले आणि सी. रामचंद्र यांचे मतभेद आहेत. ते जर आड येणार नसतली. आपल्या मान सन्मान राखला जाणार असेल तर हे गाणं गाण्यासाठी पण तयार असल्याचं लता मंगेशकर यांनी प्रदीप यांना सांगितलं. अशा प्रकारे लता मंगेशकर आणि आशा भोसले या दोघींनीही हे गाणं गाण्याची तयारी दर्शवली. या क्षणापर्यंत त्या दोघी ही हे गाणं गाणार असल्याचं जवळपास निश्चित झालं होतं असं मितूल यांनी सांगितलं.
स्वातंत्र्यदिनी ॲक्शन, थ्रिलरचा तडका! 15 ऑगस्टला येणार 'हे' धमाकेदार चित्रपट अन् वेबसिरीज
ठरल्या प्रमाणे ऐ मेरे वतन के लोगो या गाण्याचं रेकॉर्डींग करण्याचं ठरलं. त्यानुसार रेकॉर्डींग होतं त्या दिवशी लता मंगेशकर आणि आशा भोसले या दोघी ही रेकॉर्डींग स्टुडीओत पोहोचल्या. दोघी ही गाणं गाणार हे ठरलं होतं. पण आत गेल्यावर त्या दोघींमध्ये काही तरी भांडण झालं. हे भांडण कडाक्याचं असाव. त्यामुळेच की काय आशा भोसले या स्टुडीओतून रडत रडत बाहेर पडल्या. त्यानंतर त्या तिथून निघून गेल्या. पुढे हे गाणं लता मंगेशकर यांनी गायलं. हा कुणाला ही माहित नसणारा किस्सा या निमित्ताने कवी प्रदीप यांच्या कन्या मितूल यांनी सांगितला.