Indian Airports: ही जगातील सर्वात सुंदर विमानतळं आहेत का?

सरकारी प्रकल्पांना अनेक समस्यांनी ग्रासलेले असते. ज्यात खराब डिझाइन, चुकीचे करार,भ्रष्टाचार,कामात तडजोड अशा गोष्टी होत असतात.

जाहिरात
Read Time: 4 mins
मुंबई:

भारतात विमान प्रवासाचा अनुभव कधीकधी निराशाजनक असू शकतो. मोठ्या विमानतळांवर विमानांना अनेकदा उशीर होतो. सुरक्षा नियम एका शहरातून दुसऱ्या शहरात बदलताना दिसतात. एअरसाइड बीअरची किंमत तर हीथ्रो विमानतळावरही लाजवेल इतकी जास्त असते. तरीही, या त्रासांची भरपाई करणारा एक चांगला घटक आहे. भारतातील काही विमानतळे जगातील सर्वात सुंदर विमानतळांपैकी आहेत. ते भारताची क्षमता आणि कमतरता दर्शवतात, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. जगभरातील आधुनिक विमानतळे साधारणपणे काच आणि स्टीलच्या रचनेवर आधारित असतात. जिथे बहुतेक ठिकाणी पांढरा रंग मोठ्या प्रमाणात वापरलेला जातो हे निदर्शनास आले आहे. उदयोन्मुख राष्ट्रे भव्य वास्तू उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करतात. गेल्या 25 वर्षांत आशिया आणि मध्यपूर्वेतील देशांची आर्थिक शक्ती जसजशी वाढत गेली, तसतशी त्यांनी भव्य टर्मिनल बांधून आपले नवे महत्त्व दर्शवले आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कतार या देशाने  नेहमीच राजकीयदृष्ट्या आपल्या क्षमतेपेक्षा अधिक प्रभाव पाडण्याचा निर्धार केला आहे. या देशाने 2014 मध्ये हमद आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू केले. बांधकामावर त्यावेळी खास लक्ष देण्यात आले. रेसेप तय्यप एर्दोगान यांच्या नेतृत्वाखाली तुर्कीने 2018 मध्ये इस्तंबूलमध्ये जगातील सर्वात मोठ्या विमानतळांपैकी एक विमानतळ सुरू केले. चीनचे बीजिंग डॅक्सिंग हे पूर्ण झाले आहे. आकर्षक,आधुनिक आणि महत्त्वाकांक्षी असे हे विमानतळ आहे. ही विमानतळं स्वतःची आणि त्यांच्या देशांची भविष्य म्हणून ओळख करून देतात. भारतात मात्र तसे दिसत नाही. बंगळूरुचे टर्मिनल 2  जे 2023 मध्ये सुरू झाले. ते "उद्यान टर्मिनल" म्हणून डिझाइन केले गेले आहे. जे "उद्यानांचे शहर" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिरव्यागार बंगळूरु महानगराचा संदर्भ देते. ते चीन किंवा मध्यपूर्वेतील कोणत्याही गोष्टींपेक्षा वेगळे आहे. अलीकडेच भारताला भेट दिलेले अमेरिकन विचारवंत बिल ड्रेक्सेल यांना बंगळूरुचे नवीन टर्मिनल पाहून आश्चर्य वाटले. ते म्हणतात, मी पहाटेच्या वेळी पोहोचलो होतो. ज्यावेळी एअरपोर्ट पाहिले तो आपल्यासाठी सुखद धक्का होता. त्याच सहलीत सहभागी झालेले विश्लेषक टॅनर ग्रीर यांनी लिहिले की, "सौंदर्याच्या दृष्टीने, भारत हा कधीही चीन पेक्षा उजवा ठरतो. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Satara News: 1 व्हिडीओ, 1 कोटीची खंडणी, 1 डॉक्टर हनीट्रॅपच्या जाळ्यात कसा अडकला? पुढे काय झालं?

भारताच्या आधुनिक विमानतळ बांधणीच्या कामात उघडलेली पहिली मोठी नवीन टर्मिनल चीनमधील विमानतळांसारखी बनवण्याची आकांक्षा बाळगणारी होती. 2008 मध्ये सुरू झालेले बंगळूरु आणि हैदराबादमधील विमानतळे ही सामान्य पणे  काच आणि स्टीलच्या सहाय्याने बनवली आहेत. 2010 मध्ये सुरू झालेल्या दिल्लीच्या चकचकीत टर्मिनल 3 चे सौंदर्य ही सर्वांना हेवा वाटणारेच म्हणावे लागेल. मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. विमानतळांच्या छताला आधार देणाऱ्या मोठ्या स्तंभांच्या तपशीलात, दिव्यांच्या फिक्स्चरमध्ये, अगदी चिन्हांमध्येही हे चित्र दिसते. विमानतळ बांधणी करणाऱ्या 'जीव्हीके'ला हे निश्चित करायचे होते की जेव्हा कोणी विमानतळावर पोहोचेल, तेव्हा त्यांना त्वरित कळेल की ते भारतात आहेत, असे 'स्किडमोर ओविंग्स अँड मेरिल' या अमेरिकन कंपनीचे डेरेक मूर सांगतात. बंगळूरुच्या दुसऱ्या टर्मिनलनेही 'स्किडमोर ओविंग्स अँड मेरिल'ने तसेच केले. मूर यांच्यासाठी, हे दोन प्रकल्प त्यांच्या कारकिर्दीचे उच्च क्षण आहेत. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Dharashiv Crime : विवाहित महिलेसोबत प्रेमाची अशी मिळाली 'शिक्षा'; 18 वर्षांच्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू 

गोवाचे दुसरे विमानतळ 2023 मध्ये सुरू झाले. हे आणखी एक उदाहरण आहे. त्याच्या आतील भागात पोर्तुगीज शैलीतील घरांचे दर्शन होते. गोव्यात ते प्रत्येक ठिकाणी दिसते. मुंबईसाठी दुसरे विमानतळ, मे महिन्यात कार्यान्वित होणार आहे. ते भारताचे राष्ट्रीय फूल असलेल्या कमळाच्या आकाराचे असेल. ब्रिटिश फर्म झाहा हदीद आर्किटेक्ट्सने डिझाइन केलेले हे विमानतळ देखील वैशिष्ट्यपूर्ण असेल याची खात्री आहे. ते ही भारतातील सुंदर विमानतळा पैकी एक ठरणार आहे.  सरकारी प्रकल्पांना अनेक समस्यांनी ग्रासलेले असते. ज्यात खराब डिझाइन, चुकीचे करार,भ्रष्टाचार,कामात तडजोड अशा गोष्टी होत असतात. गेल्या वर्षी जोरदार पावसामुळे तीन विमानतळांचे छत कोसळल्याची घटना घडली. नवीन महामार्ग आणि पुलांना लवकरच भेगा किंवा खड्डे पडतात. उड्डाणपुलांमधील सांधे अचूक नसतात. ज्यामुळे प्रवास सुखद होत नाही. 2022 मध्ये, 'वर्ल्ड बँक'मधील संशोधकांनी 162 देशांतील मोठ्या शहरांमधील सरासरी वेगाचा पायाभूत सुविधांच्या गुणवत्तेचा एक मापदंड म्हणून अभ्यास करणारा एक अहवाल प्रकाशित केला. मागील दोन दशकांत हजारो महामार्ग बांधूनही, भारत 127 व्या क्रमांकावर होता. असं असलं तरी गुणवत्ता ही केवळ संख्येने भरून काढता येत नाही.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Pakistan Attack: पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला, 90 सैनिक ठार झाल्याचा BLA चा दावा

विमानतळावर सुरक्षा अधिकारी प्रत्येक प्रवाशाची हाताने तपासणी करतात. प्रत्येक तिसरी बॅग हाताने तपासली जाते. इमिग्रेशन अधिकारी कागदपत्रांच्या हार्ड-कॉपीवर आग्रह धरतात. सीमाशुल्कात, प्रवाशांना विमानतळावरून बाहेर पडताना बॅग एक्स रे यंत्रांमध्ये लोड करणे आवश्यक असते. अनेक नवीन विमानतळांवर सार्वजनिक वाहतूक जोडणी नाही. ही सर्व कार्ये राज्याद्वारे हाताळली जातात. भारतीय विमानतळे देशाच्या भूतकाळाची आठवण करून देण्यासाठी डिझाइन केलेली आहेत. हीच विमानतळे जगातील सर्वोत्तम विमानतळे ठरतील असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.