Read more!

Indian Railway: रेल्वेत ज्येष्ठ नागरिकांना कन्फर्म मिळणार लोअर सीट! 'या' पद्धतीनं करा बुकिंग

भारतीय रेल्वेनं ज्येष्ठ नागरिकांना आरामात प्रवास करता यावा यासाठी लोअर बर्थ रिझर्व्हेशनसाठी (Lower Berth Reservation)  खास नियम तयार केले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

भारतीय रेल्वेनं ज्येष्ठ नागरिकांना आरामात प्रवास करता यावा यासाठी लोअर बर्थ रिझर्व्हेशनसाठी (Lower Berth Reservation)  खास नियम तयार केले आहेत. हे नियम 60 वर्षांपेक्षा जास्त वयांचे पुरुष आणि 45 पेक्षा जास्त वयांच्या महिला यांना लागू आहे. ज्येष्ठ नागरिक एकटे किंवा त्यांच्या नातेवाईकांसह  (Senior Citizen Railway ticket rules) प्रवास करत असतील तर त्यांना या नियमांचा फायदा मिळतो. दोन किंवा जास्त लोकांसोबत ते रेल्वेतून प्रवास करत असतील तर त्यांना ही सूविधा मिळणे अवघड होऊ शकते.

सणासुदीच्या दिवसांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची खास काळजी घेतले जाते. त्यांना लोअर बर्थ मिळण्याची शक्यता जास्त असते. त्यासाठी रेल्वेचं तिकीट बुक (Train icket Booking) करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते, ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

ही गोष्ट विसरु नका

ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकीट बुक करत असताना कोटा  (IRCTC Senior Citizen Quota) सुविधा लक्षात ठेवा. IRCTC आणि अन्य ऑनलाईन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्मवर ही सुविधा उपलब्ध असते. या पद्धतीनुसार तिकीट बुक केले तर ज्येष्ठ नागरिकांना लोअर बर्थ मिळण्याची शक्यता वाढते. 

ग्रुपममध्ये कसं मिळवणार लोअर बर्थ?

तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासोबत रेल्वेनं प्रवास करत असाल तर ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकीट (Senior Citizen Reservation) वेगळं बुक करा. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना लोअर बर्थ (Lower Berth Quota) मिळण्याची संधी मिळते. कारण, ग्रुुपममध्ये प्रवास करत असताना ज्येष्ठ नागरिकांना लोअर बर्थ मिळणे अवघड असते. 

(नक्की वाचा : कामाची बातमी : Loan घेतल्यानंतर मृत्यू झाला तर कर्ज माफ होतं का? )
 

वयाची चूक करु नका

ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीट बुक करताना (Train ticket Booking For Senior citizen) त्यांचे वय लिहिण्यामध्ये कोणतीही चूक करु नका. कारण त्यामुळे त्यांना सिनिअर सिटीझन कोट्याचा लाभ मिळणार नाही. तसंच लोअर बर्थही मिळणार नाही.  

कधी करावे रिझर्व्हेशन?

सणासुदीच्या दिवसामध्ये रेल्वेचं कन्फर्म तिकीट मिळणं ही मोठी गोष्ट असते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकीट बुक   (Senior Citizen Reservation) करायचं असेल तर ते किमान 15 दिवस आगोदर बुक करावे. कारण त्यावेळी तिकीट कन्फर्म मिळण्याची शक्यता जास्त असते. त्याचबरोबर एसी क्लासपेक्षा स्लीपर कोचमध्ये जास्त तिकीट असतात. त्यामुळे स्लीपर कोचमध्ये लोअर बर्थ मिळण्याची शक्यता अधिक असते. 

ज्येष्ठ नागरिकांना तरीही मिडल बर्थ मिळालं तर काळजी करु नका. त्या परिस्थितीमध्ये तिकीट चेकर येण्याची वाट पाहा. त्यांना लोअर बर्थ देण्याची विनंती करा. त्यांच्याकडे बर्थ शिल्लक असेल तर ते लगेच तुमचे सीट ट्रान्सफर करेल. अन्यथा थोडा प्रयत्न करुन लोअर बर्थची व्यवस्था करेल. ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिलचेअर, स्पेशल काऊंटर सारख्या सुविधा त्याचा नक्की लाभ घ्या. 

Topics mentioned in this article