मुंबईच्या मुलीची कमाल ! 2 वर्षांपूर्वी गमावला हात, 12 वी मध्ये मिळवले 92%

ICSE Board Exam : दोन वर्षांपूर्वी झालेल्या अपघातामध्ये एक हात गमावलेल्या अनामतानं 92 टक्के मार्क्स मिळवले आहेत. 

Advertisement
Read Time: 2 mins
I
मुंबई:

Motivational Story: संकट कुणालाही चुकलेली नाहीत. आम आदमीपासून विशेष व्यक्तीपर्यंत प्रत्येकालाच आयुष्यातील कोणत्यातरी टप्प्यात संकटांचा सामना करावा लागतो. आयुष्याची सुरळीत सुरु असलेली गाडी या संकटांमुळे अडचणीत येते. पण, काही जण मोठ्या जिद्दीनं या संकटावर मात करतात. त्यांच्या जिद्दीचा प्रवास इतरांना प्रेरणा देणारा ठरतो. मुंबईतली 15 वर्षांची अनमाता अहमद (Anamta Ahmed) ही अशीच एक जिद्दी मुलगी आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या अपघातामध्ये एक हात गमावलेल्या अनामतानं ICSE बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत 92 टक्के मार्क्स मिळवले आहेत. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

खेळताना झाला अपघात आणि....

अनमाता 13 वर्षांची असताना झालेल्या या अपघातामध्ये तिचं आयुष्य बदललं. ती अलिगडमध्ये तिच्या भावंडासह खेळत होती. त्यावेळी 11 केव्ही केबलचा इलेक्ट्रिक शॉक लागला. हा धक्का इतका जबरदस्त होता की त्यामुळे तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी जळाल्याच्या जखमा झाल्या. 

या अपघातानं अनामातचं आयुष्य बदलला. अनामतानं उजवा हात गमावला. तर डाव्या हातानं काम करण्याची क्षमता फक्त 20 टक्केच शिल्लक राहिली. जवळपास 50 दिवस ती अंथुरणावरच होती. पण, आयुष्य कुणासाठीही थांबत नाही. ते पुढं सरकत असतं. अनमातानंही या धक्क्यातून खचून न जाता पुढं जाण्याचा निर्णय घेतला. या जीवघेण्या अपघातानंतरही ती जिद्दीनं अभ्यासाला लागली. अनामतानं आयसीएसई बोर्डाच्या 12 वीच्या परिक्षेत तब्बल 92 टक्के मार्क्स मिळवले आहेत. हिंदी या विषयात तिला 98 टक्के मार्क्स मिळाले असून ती यामध्ये टॉप स्कोरर आहे. 

( नक्की वाचा : विदर्भातल्या शेतकऱ्याचा मुलगा JEE मेन्समध्ये देशात पहिला, जाणून घ्या यशाचं गुपित )
 

डॉक्टरांनी दिला होता ब्रेकचा सल्ला

या अपघातून सावरण्यासाठी अनामातानं अभ्यासातून एक ते दोन वर्ष ब्रेक घ्यावा, असा सल्ला डॉक्टरांनी तिच्या आई-वडिलांना दिला होता. पण, अनमाताला इतके दिवस घरात नुसतं बसणं मान्य नव्हतं. हा अपघात आपलं आयुष्य ठरवणार नाही, हा निश्चय तिनं केला. 

Advertisement

या अपघातामधून वाचल्याबद्दल ती स्वत:ला सुदैवी समजते. त्याचबरोबर घरामध्ये येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची मला सहानुभूती नको, असंही तिनं बजावलं होतं. अनाहतानं तिचं सर्व लक्ष अभ्यासावर केंद्रीत केलं. त्यामुळे तिनं हे घवघवीत यश मिळवलंय. बारावीची परीक्षाच नाही तर आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर झगडणाऱ्या सर्वांसाठी तिचं हे यश नेहमी प्रेरणा देणारं असेल.