Mumbai Joint Commissioner of Intelligence: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर राज्य सरकारने मुंबई पोलिसांमध्ये एक अतिरिक्त सहआयुक्त पदाची निर्मिती करण्याची घोषणा केली होती. गुप्तवार्ता सहआयुक्त म्हणून हे पद ओळखले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मुंबईच्या पहिल्या गुप्तवार्ता सहआयुक्त पदावर आरती सिंह कर्तव्यदक्ष महिला आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. राज्य सरकारनं याबाबतचे पत्रक जारी केले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आता मुंबईत 6 सहपोलीस आयुक्त
यापूर्वी मुंबईत 5 सहपोलीस आयुक्त होते. नवीन सहपोलीस आयुक्त झाल्यामुळे आता त्यांची संख्या ६ झाली आहे. गुप्तवार्ता सहआयुक्त बनवण्यामागचा मुख्य उद्देश दहशतवादावर बारीक नजर ठेवणे आणि कोणत्याही समाजघातक कृतींना वेळेत प्रतिबंध करणे हा आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचे सुरक्षा तज्ज्ञांनी स्वागत केले आहे.
कोण आहेत आरती सिंह?
आयपीएस आरती सिंह महाराष्ट्र केडरच्या आयजी (महानिरीक्षक) दर्जाच्या अधिकारी आहेत. सध्या त्या महाराष्ट्रात महानिरीक्षक प्रशासन म्हणून आपली जबाबदारी सांभाळत होत्या. आरती सिंह मूळच्या उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील आहेत. त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही काळ या क्षेत्रात . त्यानंतर त्यांनी डॉक्टरी सोडून यूपीएससीची तयारी केली.
( नक्की वाचा : Nagpur News : नागपूरमध्ये मशीद आणि मदरशाजवळ लागले QR कोड, ATS च्या तपासात काय संशय? )
अमरावती पोलीस आयुक्त
2006 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आरती सिंह यापूर्वी अतिरिक्त पोलीस आयुक्त (एसीपी) म्हणूनही कार्यरत होत्या. याशिवाय, त्यांनी महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हा गडचिरोली आणि कोविड काळात मालेगाव येथेही काम केले आहे. त्या अमरावती शहराच्या पहिल्या महिला पोलीस आयुक्तही राहिल्या आहेत.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या तपासाचीही जबाबदारी
ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरमधील एका शाळेत काही महिन्यांपूर्वी दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता. अलीकडेच महाराष्ट्रातील बदलापूर जिल्ह्यातील एका शाळेतील दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीच्या प्रमुख आयपीएस अधिकारी आरती सिंहच होत्या. आरती सिंह यांच्या कामाच्या पद्धतीमुळे आणि कार्यक्षमतेमुळे एका कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी अशी त्यांची ओळख आहे.