Pune News: पुण्यातील 'या' परिसरात लगीनघाई संकटात! तब्बल 10 हजार लग्न लांबणीवर? कारण वाचून सर्वच झाले थक्क

इराण इस्रायल युद्धाचे पडसाद आता थेट सर्वसामान्यांच्या किचनसह लग्नाच्या मांडवापर्यंत पोहोचले आहेत.पिंपरी-चिंचवड शहरात ऐन लग्नसराईच्या हंगामात गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
Pune Latest News Update
पुणे:

सूरज कसबे , प्रतिनिधी

Pune Latest News : इराण इस्रायल युद्धाचे पडसाद आता थेट सर्वसामान्यांच्या किचनसह लग्नाच्या मांडवापर्यंत पोहोचले आहेत.पिंपरी-चिंचवड शहरात ऐन लग्नसराईच्या हंगामात गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे पुढील दोन महिन्यांतील तब्बल 10 ते 12 हजार लग्न सोहळे संकटात सापडले आहेत. परिस्थिती इतकी गंभीर आहे की,गॅसअभावी कॅटरर्सनी घेतलेल्या ऑर्डर्स रद्द करण्यास सुरुवात केल्याने वधू-वरांच्या कुटुंबासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

कॅटरिंग व्यवसाय कोलमडला

शहरात एप्रिल आणि मे महिन्यात लग्नाचे जवळपास 30 मुहूर्त आहेत. एका मुहूर्ताला जवळपास 500 या प्रमाणे एकूण 12 हजार लग्नांची तयारी पूर्ण झाली होती. मात्र, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत गेल्या चार दिवसांत 400 रुपयांची वाढ होऊन तो 1600 रुपयांवर पोहोचला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, काळ्या बाजारात एका सिलिंडरसाठी 5000 रुपये मोजावे लागत आहेत. यामुळे शहरातील 450 नोंदणीकृत कॅटरर्स हतबल झाले असून जवळपास 45 हजार कामगारांच्या रोजगारावरही टांगती तलवार आहे.

नक्की वाचा >> गोविंदाला गोळी कशी लागली? काय घडलं होतं? गोविंदा-सुनीताच्या नात्याबाबत फिजिओथेरेपिस्टचा मोठा खुलासा

लग्नाचे बजेट कोलमडणार

ज्या केटरर्सनी अद्याप काम सुरू ठेवले आहे, त्यांनी गॅसच्या वाढीव दरामुळे प्रति थाळी 10 ते 20 टक्के दरवाढ लागू केली आहे. यामुळे सामान्य जनतेचे लग्नाचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. अनेक ठिकाणी गॅस उपलब्ध नसल्याने केटरर्सनी थेट हात वर केले आहेत.

 * बाधित लग्ने: 10 ते 12 हजार
 * नोंदणीकृत कॅटरर्स: 450
 * गॅस दरवाढ: 4 दिवसांत 400 रुपये (व्यावसायिक)
 * काळा बाजार दर: 5000 रुपये प्रति सिलिंडर

आता या गंभीर संकटातून मार्ग काढण्यासाठी प्रशासन काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.