'लादेन समाजामुळे दहशतवादी बनला', कलामांशी तुलना करत आव्हाडांच्या पत्नीचं धक्कादायक वक्तव्य

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड एका कथित वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आल्या आहेत. आव्हाड यांनी अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड ओसामा बिन लादेनची तुलना माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याशी केली आहे. आव्हाडांचा मतदारसंघ असलेल्या मुंब्रामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. भाजपानं त्यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केलीय. हे वक्तव्य व्हायरल होताच ऋता आव्हाड यांनी त्यावर स्पष्टीकरण देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाल्या आव्हाड?

ऋता आव्हाड या मुंब्र्यातील कार्यक्रमात बोलताना म्हणाल्या की,  'ओसामा बीन लादेनचं चरित्र वाचा. ज्या पद्धतीनं एपीजे अब्दुल कलाम हे कलाम साहेब घडले  तसाच ओसामा बिन लादेन दहशतवादी बनला. तो दहशतवादी का बनला? जन्मत: तर नव्हता ना? त्याला समाजानं दहशतवादी बनवलं. तो रागातून दहशतवादी बनला.'

भाजपाचा हल्लाबोल

भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी आव्हाडा यांच्या भाषणाचा व्हिडिओ ट्विट करत त्यावर टीका केली आहे. 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नीनं ओसामा बिन लादेनचं समर्थन आणि प्रशंसा केली आहे. त्यांनी लादेनची तुलना APJ अब्दुल कलाम यांच्याशी केली आहे. समाजानं त्याला दहशतवादी बनवलं, असं त्या म्हणत आहेत.

जितेंद्र आव्हाड यांनी लष्कर-ए-तोयबाची दहशतवादी इशरत जहाँचं समर्थन केलं होतं.  काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, समाजवादी पार्टी आघाडीच्या नेत्यांनी नेहमीच याकूब, अफजल, सिमी, कसाब आणि अन्य दहशतवाद्यांची पाठराखण केली आहे,' अशी टीका पूनावाला यांनी केली. 

Advertisement

आव्हाडांकडून सारवासारव

दरम्यान, भाषणातील कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ऋता आव्हाड यांनी या विषयावर स्पष्टीकरण दिलं आहे. 'आजची पिढी वाचत नाही. त्यामुळे मी त्यांना मोबाईल फोन सोडा आणि वाचा असा सल्ला दिला. मी त्यांना डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं 'विंग्स ऑफ फायर' हे पुस्तक वाचण्यास सांगितलं. 

( नक्की वाचा : दहशतवाद्यांनी पाणी मागितलं आणि... पोलिसांनी सांगितला थरारक अनुभव! )
 

मी त्यांना आयुष्यातील दुसरी बाजू ओसमा बिन लादेन दहशतवादी का बनला? हे सांगितलं. कुणीही जन्मत: चांगला किंवा वाईट नसतो. ओसामावरचं एक पुस्तक त्याला ठार मारल्यानंतर न्यूयॉर्कमध्ये बेस्ट सेलर होतं. त्याच्या आयुष्यात काय घडलं एखादी व्यक्ती चांगली किंवा वाईट कशी बनते हे देखील समजणं उत्कंठावर्धक आहे. माझ्या एका वाक्याची तोडफोड करण्यात आली आहे. ते काय आहे हे मला माहिती नाही.'

Advertisement
Topics mentioned in this article