अमजद खान
कल्याण डोंबिवली महापालिकेचा वर्धापन दिन 1 ऑक्टोबरला साजरा केला जातो. पण हा दिवस काळा दिवस म्हणून पाळा असे आवाहन मनसे नेते राजू पाटील यांनी केले होते. शिवाय त्यांना हा दिवस काळा दिन म्हणूनच पाळला. केडीएमसी प्रशासनावर त्यांनी यावेळी टिका ही केली. या संदर्भात त्यांनी केडीएमसी ऐवजी केडी'यम'सी या आशयाचे ट्वीट केले. सोशल मीडियालर केलेल्या त्यांच्या या पोस्टची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. शिवाय ही पोस्टही व्हायरल झाली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेची स्थापना 1 ऑक्टोबर 1983 साली झाली. 1983 सालापासून 1994 पर्यत प्रशासकीय राजवट होती. 1995 साली पहिली महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली. 1983 पासून महापालिका हद्दीतील 27 गावांना सोयी सुविधा उपलब्ध होत नसल्याने ही गावे 2002 साली महापालिकेतून वगळण्यात आली. त्यानंतर ही गावे 2015 साली पुन्हा महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. आत्ता पुन्हा ही गावे वेगळी करण्याची मागणी सरकारने लटवून ठेवल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या गावातील लोकांची मोठी नाराजी आहे.
हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. महापालिकेत अनेक आयुक्त येऊन गेले. त्यांचे प्रशासनावर नियंत्रण नसल्याचा आरोप होत आहे. आत्तापर्यंत अनेक अधिकारी कर्मचारी हे लाच घेताना पकडले गेले आहेत. महापालिकेची रुग्णालये योग्य प्रकारे सेवा सुविधा देऊ शकत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी उपचारासाठी गेलेल्या रुग्णांचा मृत्यू होतो. 27 गावातील पाणी पुरवठा योजना अडकली आहे. महापालिका हद्दीतील रस्त्यावरील खड्ड्यांचा विषय दरवर्षी चर्चीला जातो. त्यासाठी दवर्षी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. मात्र कायम स्वरुपी उपाययोजना केली जात नाही. स्टेशन परिसरातील स्मार्ट सिटीचा प्रकल्प संथ गतीने सुरु आहे.
नक्की वाचा - Dombivali News: ती रडत होती मात्र सांगू शकत नव्हती, जेव्हा खरं कारण समजलं तेव्हा...
राज्य सरकारने कल्याण ग्रोथ सेंटरचे दिलेले आश्वासन पूर्ण झालेले नाही. रस्ते विकासातील प्रकल्प धारकांना अद्याप मोबदला दिला गेलेला नाही. पाणी समस्या, रस्त्यावरील खड्डे, आरोग्य सोयी सुविधा, रखडलेले प्रकल्प ही रडगाथा सुरु आहे. नागरीकांना सोयी सुविधा देण्यात महापालिका प्रशासनाकडून तत्परता दाखविली जात नाही असा ही आरोप आहे. मात्र नागरीकांकडून कर वसूली करुन त्याच पैशातून महापालिकेच्या मुख्यालयावर रोषणाई केली जाते. नागरीकांच्या जखमेवर एक प्रकारे मीठ चोळण्याचे काम महापालिका प्रशासन करीत आहे. महापालिका हद्दीत समस्याचा डोंगर असताना 1 ऑक्टोबर हा वर्धापन दिन साजरा न करता काळा दिवस पाळला पाहिजे अशी अशी टिका मनसे नेते राजू पाटील यांनी या निमित्तान केली आहे. याबाबतची सोशल मीडिया पोस्टही त्यांनी केली आहे. ती सध्या व्हायरल होत आहे.