Kalyan Rain : कल्याण-डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडतोय. या पावसामुळे काही दिवस जनजीवन ठप्प झालं होतं. रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं त्यामधून वाट काढण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागत होती. नागरिकांच्या मदतीला एनडीआरफची टीम सज्ज होती. या टीमनं भर पावसात जपलेल्या माणुसकीची सध्या चर्चा होत आहे.
कल्याण-टिटवाळानजीकच्या एका रिहॅबिलेशन सेंटरमध्ये एका महिलेचा नैसर्गिक मृत्यू झाला हाेता. मात्र जोरदार पावसामुळे साचलेल्या पाण्यातून महिलेचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी पर्यंत कसा घेऊन जायचा ? असा प्रश्न होता. त्यावेळी तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या पुढाकारने एनडीआरएफ टीम पोहचली. या टीमने महिलेचा मृतदेह बोटीतून स्मशानभूमीपर्यंत पोहचविल्याने तिच्यावर अंत्यसंस्कार करता आले.
नेमकं काय घडलं?
कल्याण ग्रामीण भागात गेल्य दोन दिवसापासून जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे काळू आणि उल्हास नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. दोन्ही नद्या दुथडी भरुन वाहत आहे. पावसाचे पाणी ठिकठिकाणी साचले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत टिटवाळानजीकच्या फेळे गावात मनासा या रिहॅबिलेशन सेंटरमधील जिजाबाई मंचेकर यांचा नैसर्गिक मृत्यू झााला. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला होता.
( नक्की वाचा : Sangli News : लग्नानंतर तब्बल 21 वर्षांनी झाला मुलगा, कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात सोडला... कारण काय? )
साचलेल्या पाण्यातून त्या महिलेचा मृतदेह स्मशानभूमीपर्यंत कसा न्यायचा असा प्रश्न सर्वांसमोर होता. या घटनेची माहिती कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाल यांना मिळाली. त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता. तातडीने एनडीआरएफ टीमशी संपर्क साधला. एका महिलेचा मृतदेदहावर अंत्यसंस्कार करायचे आहे. तिचा मृतदेह स्मशान भूमीपर्यंत न्यायचा आहे. पाण्यातून मृतदेह नेणे शक्य नाही, असे त्यांनी एनडीआरफच्या टीमला कळवले. त्यानंतर एनडीआरएफच्या टीने तातडीेन फळेगाव गाठले. त्यांनी सेंटरमधून महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. तो बोटीत ठेवला. या बोटीतून महिलेचा मृतदेह स्मशानापर्यंत नेण्यात आला. त्यानंतर त्या महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर नागरीकांना सुटकेचा श्वास सोडला आहे. मात्र एनडीआरएफने केलेल्या या कार्याला सगळ्यांनी सलाम ठाेकला आहे.