- केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया गोयलच्या कुटुंबावर मोठा मानसिक ताण आणि सामाजिक दबाव आहे
- सिया गोयलच्या वडिलांना तणावामुळे हृदयविकाराचा झटका आला असून त्यांना ICU मध्ये दाखल करण्यात आले आहे
- सिया गोयलवर केतन अग्रवालच्या हत्येचा आरोप आहे
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आणखी एक महत्वाची घडामोड समोर येत आहे. या हत्या प्रकरणाने केवळ अग्रवाल कुटुंबच नाही तर गोयल आणि चौधरी कुटुंबही भरडलं गेलं आहे. मुलांनी केलेल्या या कृत्याचा फटका या तिन्ही कुटुंबान बसताना दिसत आहे. ही त्या झाल्यानंतर सिया गोयलचं कुटुंब तणावाखाली आहे. आपल्या मुलीने असं काही कृत्य केलं आहे यावर त्यांचा विश्वास बसत नाही. ज्या मुलीला लाडाने वाढवलं तिने असं कृत्य करावं याने ते पुर्ण पणे हादरले गेले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून सियाचे वडील तणावाखाली होते. याच तणावातून आता त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे.
मुख्य आरोपी असलेल्या सिया गोयलच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सिया गोयल हिच्या वडिलांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यानंतर त्यांना पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. छातीत तीव्र वेदना होऊ लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात आणण्यात आले. गेल्या काही दिवसापासून ते तणावात होते. शिवाय लेकीने केलेल्या कारनाम्यामुळे समाजात ही इज्जत गेली होती. नातेवाईकांत ही त्याचीच चर्चा होती. त्यामुळे सर्व बाजूने गोयल कुटुंब हे टिकेचे धनी बनले होते. त्यातून संपूर्ण कुटुंबावर लपून बसण्याची वेळ आली होती.
सध्या सुरू असलेल्या पोलीस तपासाचा आणि न्यायालयीन घडामोडींचा गोयल यांच्या कुटुंबावर प्रचंड ताण आहे. या मानसिक धक्क्यामुळेच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे वैद्यकीय सूत्रांचे म्हणणे आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यामुळे त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात (ICU) हलवण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. गोयल कुटुंबाची सिया ही लाडकी मुलगी होती. तिने केलेल्या कृती मुळे किंवा तिच्यावर होत असलेल्या आरोपामुळे संपुर्ण कुटुंब अडचणीत आहे.
हे हाय-प्रोफाईल आणि संवेदनशील प्रकरण असल्याने प्रशासनाने कोणतीही जोखीम पत्करलेली नाही. रुबी हॉल क्लिनिकच्या आवारात आणि विशेषतः ICU विभागाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संपूर्ण गोयल कुटुंब सध्या पोलिसांच्या कडक देखरेखीखाली आहे. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीतील प्रत्येक बदलावर बारीक लक्ष ठेवून आहेत. गोयल कुटुंबातील मोजकेच लोक सध्या सियाच्या वडीलंसोबत आहेत. तर सिया ही पोलीस कोठडीत आहे. तिची केतन अग्रवाल हत्या प्रकरणी सखोल चौकशी होत आहे.