Holi 2026 School Holiday List: रंगांचा उत्सव म्हणजेच होळीच्या सण येऊ घातला आहे. येत्या काही दिवसांत या उत्सवाला सुरुवात होणार आहे. होळी सण साजरा करण्याची अनेकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण यंदाही होळीच्या सुट्टीच्या तारखांबाबत अनेकांचा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे. कोणी 3 मार्च तर कोणी 4 मार्चला होळी उत्सव साजरा करण्याचं नियोजन करत आहेत. पण शाळेतील विद्यार्थ्यांसह त्यांचे पालकांचाही गोंधळ उडाला आहे. कारण शाळेची सुट्टी नेमकी कोणत्या दिवशी असणार आहे?असा प्रश्न त्यांना पडला आहे. अशातच सुट्ट्यांच्या शेड्युलबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.
4 मार्चला होळीचा उत्सव
वर्ष 2026 मध्ये रंगांच्या होळीचा उत्सव 4 मार्चला बुधवारी साजरा केला जाणार आहे. तर एक दिवस आधी म्हणजेच 3 मार्चला मंगळवारी होळीचं दहन केलं जाईल. देशभरातली शाळांमध्ये होळीसाठी 4 मार्चची सुट्टी तर निश्चितच असते. पण काही राज्यांमध्ये मोठ्या सुट्टांबाबत प्लॅन केला जात असल्याची माहिती आहे.
नक्की वाचा >> Akola News: शेगावमध्ये तरुणीला केलं ब्लॅकमेल..घटनेचा पर्दाफाश होताच आरोपी गजाआड, ‘लव्ह जिहाद' अन् बरंच काही..
पालकांमध्ये 3 मार्चबाबत सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण गणनेनुसार होळी दहन 3 मार्चला येत आहे. दुसरीकडे कॅलेंडरमध्ये 2 मार्चला सुट्टी दाखवण्यात आली आहे. अशातच 3 मार्चला शाळा बंद राहतील का? सरकारकडून याबाबत अधिकृत माहिती येणं बाकी आहे. पण होळी दहन 3 मार्चला आहे, तर त्या दिवशीही अनेक शाळांमध्ये सुट्टी घोषित केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.
मार्च 2026 च्या सुट्ट्यांचा पूर्ण शेड्युल
- 1 मार्च 2026 (रविवार): साप्ताहिक सुट्टी
- 2 मार्च 2026 (सोमवार): होळी दहन (कॅलेंडरनुसार सुट्टी)
- 3 मार्च 2026 (मंगळवार): शाळा सुरु राहू शकतात (अजूनही सस्पेन्स कायम)
- 4 मार्च 2026 (बुधवार): होळी (रंगांचा उत्सव - सुट्टी)