5 hours ago

Live Update : कृषीमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतल्यापासूनच माणिकराव कोकाटे वेगवेगळ्या वादात सापडले आहेत. आता त्यांच्या ताज्या वक्तव्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे.  कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचे तुम्ही काय करता ? शेतीमध्ये एक रुपयाही तरी गुंतवणूक करता का ? असा प्रश्न कोकाटे यांनी विचारला आहे. नाशिकच्या माडसांगवी गावात शुक्रवारी (4 एप्रिल) कृषीमंत्र्यांनी नुकसाण पाहणी दौरा केला, त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांनाच हा प्रश्न विचारला. 

Apr 05, 2025 21:37 (IST)

Live Update : मुंबईच्या डबेवाले चालले सुट्टीवर...कारण काय?

मुंबईची ओळख असलेले आणि ज्यांच्या नेटवर्कवर लाखो मुंबईकरांची क्षुधा शांत होते, ते डबेवाले बुधवार, 9 एप्रिलपासून सहा दिवसांच्या रजेवर चालले आहेत. 9 ते 14 एप्रिलपर्यंतच्या सहा दिवसांच्या कालावधीत मुंबईतील बहुतांश डबेवाले आपापल्या गावांतील यात्रांमध्ये सहभागी होणार आहेत. 15 एप्रिलपासून पुन्हा एकदा डबेवाले मुंबईकरांच्या सेवेत हजर होतील.

मुंबईतील नोकरदार वर्ग हा मोठ्या प्रमाणातील डबेवाल्यांच्या सेवांवर अवलंबून आहे. मुंबईत कार्यालयांमध्ये डबे पोहोचवण्याची करामत साध्य करणारे डबेवाले मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, या तालुक्यातील भागातील गावांमधून येतात. त्या ठिकाणी गावा कडील ग्रामदैवत/ कुलदैवतांच्या यात्रा सुरू झाल्या असून त्यात सहभागी होण्यासाठी मुंबईतील डबेवाले गावी जाणार आहेत. त्यामुळे ९ ते १४ एप्रिलपर्यंत डबे पोहोचवण्याची सेवा डबेवाल्यांनी बंद ठेवली आहे. 

Apr 05, 2025 21:01 (IST)

Live Update : PM मोदींनी घेतली 1996 च्या वर्ल्ड कप विजेत्या श्रीलंकन खेळाडूंची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंका दौऱ्यात वर्ल्ड कप विजेत्या श्रीलंकेच्या टीमची भेट घेतली. श्रीलंकेनं 1996 साली वन-डे वर्ल्ड कप जिंकला होता. त्या टीममधील प्रमुख खेळाडूंची भेट पंतप्रधानांनी घेतली. या भेटीमध्ये रोमेश कालुविथरणा, मर्वन अट्टापटूट्, कुमार धर्मसेना, अरविंदा डिसिल्व्हा, सनथ जयसूर्या, चामिंडा वास, रवींद्र पुष्पकुमारा आणि उपुल चंदना उपस्थित होते. 

पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया नेटवर्क X वर या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. 

Apr 05, 2025 20:40 (IST)

Live Update : कृषीमंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया

सरकारमध्ये काम करत असताना विचारपूर्वक वक्तव्य केलं पाहिजे, असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत असताना ते बोलत होते. माणिकराव कोकाटे काय बोलले माहिती नाही. ते नक्की काय बोलले त्यांना विचारावे लागेल, असं त्यांनी सांगितलं. 

 

Apr 05, 2025 17:37 (IST)

Solapur News: सोलापुरातील त्या मुलींचा डेंग्युने मृत्यू, महापालिका आयुक्तांची माहिती

- सोलापुरात दूषित पाण्यामुळे दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाल्याचे प्रकरण 

- मुलींच्या मृत्यूबाबत महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांची माहिती

- संबंधित 2 मुलींचा मेंदूज्वरमुळे अर्थात डेंग्यूमुळे त्या मुलींच्या प्लेटलेट्स कमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती

- शहरातील कोणत्याही भागात डेंग्यूसदृश कोणत्याही आजाराची लक्षणे दिसली तर तात्काळ महापालिकेला कळवा

- महापालिका आयुक्त सचिन ओम्बासे यांचे सोलापूरकर जनतेला आवाहन

Advertisement
Apr 05, 2025 17:29 (IST)

LIVE Update: करुणा मुंडेंना मोठा दिलासा! धनंजय मुंडेंची याचिका कोर्टाने फेटाळली

माझगाव कोर्टाने धनंजय मुंडे यांना मोठा धक्का दिला आहे. माजगाव कोर्टाने धनंजय मुंडे याचिका फेटाळली असून पोटगी देण्याचा वांद्रे कोर्टाचा निकाल कायम ठेवला आहे. त्यामुळे करुणा मुंडे यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

Apr 05, 2025 17:08 (IST)

LIVE Updates: बहुमताचे सरकार असताना भाजपचे कार्यकर्तेच असुरक्षित: आदित्य ठाकरे

हे हॉस्पिटल सरकारचे नियम पाळतंय का हे पाहा... बेड आरक्षित आहेत का? डॅश बोर्ड आहे का?  सरकार यावर काय कारवाई करणार आहे हे स्पष्ट कराव. देशातील पहिलं राज्य असेल की भाजपच एवढं बहुमताचे सरकार असताना भाजपचे कार्यकर्ते सुरक्षित नाहीत 

हे हॉस्पिटल सरकार ताब्यात घेणार आहे का? झालेल्या प्रकाराववर कारवाई काय करणार? मराठी भाषेवर अन्याय होतो तिथं आम्ही कुठेच मागे राहणार नाही. बाकीच्यावर बोलणार नाही आम्ही कायम मराठी माणसांसोबत आहोत, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. 

Advertisement
Apr 05, 2025 17:04 (IST)

LIVE Update: निवडणुकीतील आश्वासनांचा सरकारला विसर: हर्षवर्धन सपकाळांचे टीकास्त्र

निवडणुकीत दिलेले जे वचन होती त्याचा विसर महायुतीला पडला आहे. आमचा त्यांना प्रश्न आहे, 

निवडणुकीत आश्वासने दिली मात्र कर्ममाफीही केली नाही, त्याची फक्त आश्वासने दिली.. अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. 

Apr 05, 2025 15:19 (IST)

गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचा मोबाईल चोरीला

गृहराज्य मंत्री योगेश कदम यांचा मोबाईल चोरीला गेला आहे.  बीड दौऱ्यावर आले असताना  योगेश कदम यांचा मोबाईल गायब झाला. 

 

मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची सांत्वनासाठी भेट घेतली. या भेटीत माध्यमांचे कॅमेरे उपस्थित असताना त्यांचा मोबाईल अचानक गायब झाला. केज पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार नोंदवण्यात आली आहे.

Advertisement
Apr 05, 2025 15:18 (IST)

Beed News: गृहमंत्री योगेश कदम यांचा मोबाईल चोरीला

राज्य गृहमंत्री योगेश कदम यांचा मोबाईल चोरीला

.योगेश कदम बीड दौऱ्यावर आले असताना त्यांचा मोबाईल गायब

  मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची सांत्वनासाठी भेट घेतली. या भेटीत माध्यमांचे कॅमेरे उपस्थित असताना त्यांचा मोबाईल अचानक गायब झाला.

केज पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार नोंदवण्यात आली आहे

Apr 05, 2025 15:02 (IST)

Nashik Accident: घोटी - सिन्नर महामार्गावर अपघात, 11 जण जखमी

- नाशिकच्या घोटी - सिन्नर महामार्गावर साकुर फाट्याजवळ अपघात 

- अपघातात ११ जण जखमी, तिघे गंभीर जखमी 

- जखमींवर SMBT रुग्णालयात उपचार सुरू 

- घाटकोपरहून दर्शनासाठी शिर्डीला जात असतांना घडला अपघात

- मिनी ट्रॅव्हल बस आणि डंपरमध्ये झाला अपघात 

- अपघाताबाबत वाडीवर्हे पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू

Apr 05, 2025 15:01 (IST)

Pune News: पुण्यात लहुजी शक्ती सेनेचे आंदोलन, मंगेशकर हॉस्पिटलमसोर शेण आणि बांगड्या फेकल्या

पुण्यात लहुजी शक्ती सेनेच आंदोलन 

दीनानाथ  मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर लहुजी शक्ती सेनेकडून जोरदार आंदोलन 

लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांकडून हॉस्पिटलच्या दिशेने फेकण्यात आलं शेण आणि बांगड्या

रुग्णालय प्रशासना विरोधात लहुजी शक्ती सेनेकडून जोरदार घोषणाबाजी

रुग्णालयाच्या बिल्डिंग वर चढून आंदोलन

दोषींवर कारवाई करा अशी कार्यकर्त्यांची मागणी

Apr 05, 2025 15:00 (IST)

LIVE Updates: तनिषा भिसेंच्या कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

पुण्यातील तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या कुटुंबियांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज भिसे यांच्या कुटुंबियांनी आमदार अमित गोरखे यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनीही याप्रकरणी चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. 

Apr 05, 2025 13:32 (IST)

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण, मुख्य आरोपी अभय कुरुंदकर दोषी

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण

मुख्य आरोपी अभय कुरुंदकर दोषी

तर राजू पाटीलची निर्दोष मुक्तता

Apr 05, 2025 12:45 (IST)

बीडमध्ये अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांवर गुन्हा दाखल

 बीडमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न आंदोलक शिक्षकांनी केला होता. त्याचबरोबर पवारांनी भेट न घेतल्याचा आरोप करत संतप्त शिक्षकांनी, बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बीड - अहिल्यानगर महामार्ग आडवत रस्ता रोको केला होता. दरम्यान आता याप्रकरणी आंदोलक शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये दहा ते बारा शिक्षकांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर यामुळे आता आंदोलक शिक्षकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

Apr 05, 2025 12:15 (IST)

सोलापुरात 2 शाळकरी मुलींचा मृत्यू, दूषित पाण्यामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

सोलापुरात 2 शाळकरी मुलींचा मृत्यू तर एकीची प्रकृती गंभीर, मोदी परिसरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीतील धक्कादायक घटना. दूषित पाण्यामुळे मुलींचा मृत्यू झाल्याचा नातेवाईक आणि स्थानिकांनी आरोप केला. घटनास्थळी भाजप आमदार देवेंद्र कोठे तसेच महापालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी भेट दिली. मागील अनेक दिवसांपासून बाबू जगजीवन राम झोपडपट्टीमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा स्थानिकांचा आरोप.  

Apr 05, 2025 12:12 (IST)

पुण्यातील हडपसर परिसरात महादेववाडी कोरियन क्लब येथे टॅक्टरने दोन मुलींना चिरडले

पुण्यातील हडपसर परिसरात महादेववाडी कोरियन क्लब येथे टॅक्टरने दोन मुलींना चिरडले. जखमी मुलींवर उपचार सुरू. ट्रॅक्टरचा ब्रेक फेल झाल्याने उभा असलेल्या कारवर ट्रॅक्टर धडकला. बाजूने जाणाऱ्या मुलींना उभा असलेल्या कारची धडक बसल्याने मुली जखमी. 

 

Apr 05, 2025 10:28 (IST)

भिवंडी शहरातील पन्ना कंपाउंड परिसरात मोती कारखान्याला भीषण आग

भिवंडी शहरातील पन्ना कंपाउंड परिसरात मोती कारखान्याला भीषण आग

या कारखान्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक मोती साठवण्यात आले होते 

आगीचे कारण अजूनही अस्पष्ट असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू 

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल

Apr 05, 2025 10:26 (IST)

Kolhapur News : शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात लढा देणारे शिक्षक गिरीष फोंडे निलंबित

शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात लढा देणारे शिक्षक गिरीष फोंडे निलंबित

गिरीष फोंडे यांच्यावर निलंबनाची कारवाई 

महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीकडे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत होते

शक्तीपीठ महामार्ग विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने कारवाई

Apr 05, 2025 10:24 (IST)

Dharashiv : चैत्र पोर्णिमा यात्रेत भाविकांसाठी तुळजाभवानी मंदिर 22 तास खुले राहणार

चैत्र पोर्णिमा यात्रेत भाविकांसाठी तुळजाभवानी मंदिर 22 तास खुले राहणार 

चैत्र पौर्णिमा यात्रा 11 एप्रिल ते 15 एप्रिल कालावधीत साजरी करण्यात येणार आहे

मंदिर पहाटे एक वाजता चरणतीर्थ पूजेनंतर उघडण्यात येणार असून रात्री साडेदहा नंतर प्राक्षळ पूजेनंतर दर्शन बंद करण्यात येणार 

या कालावधीत सकाळी 6 वाजता अभिषेक पूजेला प्रारंभ होणार असल्याची माहिती

तुळजाभवानी मातेची शारदीय नवरात्र महोत्सवानंतरची चैत्र पौर्णिमा वर्षाची दुसरी मोठी यात्रा

Apr 05, 2025 10:23 (IST)

रत्नागिरी तालुक्यातील 5 गावांमधील 25 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा

रत्नागिरी जिल्ह्याच्या पाणीपातळीत घट झाली असून, पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे. दरम्यान रत्नागिरी तालुक्यातल्या 5 गावांमधील 25 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर गावातील पाळंदवाडी आणि गुरववाडी या दोन वाड्यांना देखील टँकरने पाणीपुरवठा प्रशासनाकडून सुरू करण्यात आला आहे. 

या गावातील नळपाणी योजनेला जानेवारीपासून खारं पाणी येतं. त्यामुळे गावकऱ्यांना संपूर्णपणे टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागतं. त्यामुळे पाण्याचा टँकर आला की हातातील कामे सोडून सर्वांना पाण्यासाठी जावं लागतं. मात्र ते पाणी देखील अपुरं पडत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.

Apr 05, 2025 10:19 (IST)

भाजप आमदार अमित गोरखे भिसे कुटंबियांसोबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार

भाजप आमदार अमित गोरखे हे भिसे कुटंबियांसोबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार 

तनिषा भिसे यांच्या मृत्यूला कारण दीनानाथ मंगेशकर रुग्णालय जबाबदार असल्याचा देखील त्यांचा आहे आरोप 

मुख्यमंत्र्यांना आज पुण्यात भेटून अमित गोरखे आणि भिसे परिवार देणार निवेदन

Apr 05, 2025 10:18 (IST)

कुख्यात रिल्स स्टार सुरेंद्र पाटील याला नाशिकमधून अटक

कुख्यात रिल्स स्टार सुरेंद्र पाटील याला नाशिकमधून अटक

ठाणे खंडणी विरोधी पथकाने केली अटक

सुरेंद्र पाटील विरोधात डोंबिवलीतील मानपाडा आणि रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दोन बलात्काराचे गुन्हे  दाखल

पोलिसांची पाच तपास पथके सुरेंद्र पाटील याला शोधत होती

Apr 05, 2025 10:11 (IST)

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेरील नावाचा बोर्ड रुग्णालय प्रशासनाने हटवला

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेरील नावाचा बोर्ड रुग्णालय प्रशासनाने हटवला

काल आंदोलकांनी रुग्णालयाच्या या नामफलकाला नकली नोटांचा हार घातला होता

तसेच या बोर्डला काळे फासले होते, शाई देखील फेकण्यात आली होती 

त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालय प्रशासन रुग्णालयाच्या नावाचा बोर्ड काढून घेतला 

Topics mentioned in this article