Raigad News: अलिबागच्या 'या' पर्यटनस्थळी बिबट्याचा शिरकाव, 3 जणांवर हल्ला, 2 जखमी..व्हिडीओ पाहून थरकापच उडेल

आज सकाळी अलिबागच्या मुरुड मार्गांवर असलेल्या नागावर पर्यटनस्थळावर बिबट्याचा वावर दिसल्याने पर्यटकांसह नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या बिबट्याने नागरिकांवर हल्ला केल्याची घटना घडलीय.

जाहिरात
Read Time: 2 mins
Leopard In Alibaug Viral Video

मेहबूब जमादार, प्रतिनिधी

Leopard In Alibaug Video Viral : मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. विशेषत: पुणे जिल्ह्यात बिबट्यांनी दहशतीचं वातावरण निर्माण केलं आहे. नुकतच मुंबईतही बिबट्याचा वावर होत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तसच काही दिवसांपूर्वी पनवेलमध्येही बिबट्या घुसल्याचा व्हिडीओ समोर आला होता. अशातच आज सकाळी अलिबागच्या मुरुड मार्गांवर असलेल्या नागावर पर्यटनस्थळावर बिबट्याचा वावर दिसल्याने पर्यटकांसह नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या बिबट्याने नागरिकांवर हल्ला केल्याची घटना घडलीय. बिबट्याच्या हल्ल्यात 2 जण जखमी झाल्याची माहिती उघडकीस आलीय. जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 

बिबट्याचा नागरिकांवर हल्ला, 2 जण जखमी

मिळालेल्या माहितीनुसार,अलिबाग येथील रेवदंडा -मुरुड मार्गांवर नागाव  पर्यटनस्थळी सकाळ पासूनच बिबट्याची दहशत पाहायला मिळाली.येथील वाड्या वाड्यांमध्ये बिबट्या फिरत असून काही घरांमध्ये तसेच बगीच्या ध्ये बिबट्याचा वावर होत आहे. बिबट्याने 3 नागरिकांवर हल्ला केला असून 2 जण जखमी झाले आहेत. बिबट्याच्या दहशततीमुळे येथील दुकाने बंद ठेवण्यात आली आहे.तसेच शाळाही बंद ठेवल्या आहेत. विद्यार्थ्यांना शाळेबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे.बिबट्याला जेरे बंद करण्यासाठी पोलीस प्रशासन व वन विभागाने शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहेत.

इथे पाहा बिबट्याचा खतरनाक व्हिडीओ

अलिबाग तालुक्यातील नागाव परिसरात बिबट्याचं दर्शन घडल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. नागाव परिसरामध्ये बिबट्याने काही प्राण्यांवरही हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. बिबट्याच्या या दहशतीमुळे संपूर्ण गाव व परिसर भीतीच्या छायेखाली असल्याचे बोलले जात आहे. नागाव मधील तीन व्यक्तींवर बिबट्याने हल्ला केल्या असून, दोघांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Advertisement