SSC HSC Exam Dates: 10वी आणि 12वीची परीक्षा यंदा 2 आठवडे आधीच होणार, पाहा वेळापत्रक

SSC HSC Exam 2026 Time Table: शिक्षण मंडळाने यंदाच्या वर्षी ही परीक्षा 2 आठवडे आधी घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नियोजन आणि त्यांच्यावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

राज्यात एका बाजूला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. त्याच वेळी दुसरीकडे विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Pune) आगामी फेब्रुवारी-मार्च 2026 मधील 10 वी (SSC) आणि 12 वी (HSC) बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. शिक्षण मंडळाने यंदाच्या वर्षी ही परीक्षा 2 आठवडे आधी घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नियोजन आणि त्यांच्यावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल असा मंडळाला विश्वास आहे. 

10 वी, 12 वीच्या लेखी, तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक

परिक्षेचे परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे.  मंडळाच्या परिपत्रकानुसार, 12 वी बोर्डाची लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 या कालावधीत होईल. यात माहिती तंत्रज्ञान विषयाची ऑनलाईन परीक्षा समाविष्ट आहे. तर, 10 वी बोर्डाची लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 या दरम्यान घेण्यात येईल. यासोबतच, तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. 

नक्की वाचा - Pune News: पुणे ZP निवडणुकीसाठी 73 गटांचे आरक्षण जाहीर, 'या' तालुक्यांत गट आरक्षित, पाहा संपूर्ण यादी

12 वी बोर्डाची लेखी परीक्षा

10 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 (माहिती तंत्रज्ञान विषयाची ऑनलाईन परीक्षा समाविष्ट)

12 वीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी आणि तोंडी परीक्षा 23 जानेवारी 2026 ते 9 फेब्रुवारी 2026 या दरम्यान होतील.

10 वी बोर्डाची लेखी परीक्षा

20 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026

10 वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा 2 फेब्रुवारी 2026 ते 18 फेब्रुवारी 2026 या कालावधीत होणार आहेत.

पुणे, नागपूर, मुंबईसह सर्व 9 विभागीय मंडळांसाठी हे वेळापत्रक लागू असेल. सविस्तर विषयनिहाय वेळापत्रक लवकरच मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले जाणार आहे. त्यावेळेस कोणत्या विषयाचा पेपर कोणत्या दिवशी असेल ते विद्यार्थ्यांना समजणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. 

नक्की वाचा - Ladaki bahin Yojana: आता 'या' संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध, दिवाळीचा हाफ्ता कधी जमा होणार?

सविस्तर अंतिम वेळापत्रक वेबसाईटवर प्रसिद्ध होणार

शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय शिवाय विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतू लक्षात घेता परिक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. त्याच बरोबर विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याचे दृष्टीने फेब्रुवारी-मार्च 2026 परीक्षेच्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र परीक्षांचे विषयनिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. अशी माहिती महामंडळाचे सहसचिव प्रमोद गोफणे यांनी कळवले आहे. तसे परिपत्रक त्यांच्या सहीने प्रकाशीत करण्यात आले आहे. 

Advertisement