जुई जाधव/ रिझवान शेख, प्रतिनिधी
Mahesh Tutorials Classes Latest Update : प्रसिद्ध कोचिंग क्लास म्हणून ख्याती असलेल्या महेश ट्युटोरियल्सच्या मुंबईतीलही अनेक शाखा बंद करण्यात आल्या आहेत. फक्त भायखळा भायखळा परिसरातील माजगाव भागात महेश ट्युटोरियल्सचं एकच कोचिंग सेंटर सुरू ठेवण्यात आलं आहे.यामध्ये दहावीतील 36 विद्यार्थी तर नववीत 6 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अकरावी आणि बारावीत फक्त 20 ते 25 विद्यार्थी कोचिंग सेंटरमध्ये शिक्षण घेत आहेत.
प्राथमिक माहितीनुसार महेश ट्युटोरियल्सने विद्यार्थी आणि पालकांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या क्लासच्या शाखा बंद केल्या आहेत.त्यासाठी संस्था दिवाळखोरीत निघाल्याचे कारण देण्यात आले आहे.अनेक विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची फी घेण्यात आली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांसह पालकांची चिंता वाढली आहे.
'महेश ट्युटोरियल'ने अचानक क्लास बंद केल्याने खळबळ उडाली
एकीकडे शालेय विद्यार्थ्यांच्या दहावीच्या महत्त्वाच्या परीक्षा जवळ येत असतानाच,प्रसिद्ध कोचिंग सेंटर असलेल्या 'महेश ट्युटोरियल'ने अचानक त्यांचे क्लासेस बंद केल्याने एकच खळबळ उडाली आहे.लाखो रुपयांची वार्षिक फी भरूनही कसलीही पूर्वकल्पना न देता क्लासेस बंद करण्यात आल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे.
नक्की वाचा >> Akola News: हातात भरल्या बांगड्या, ओठांवर लिपस्टिक..अकोला-बडनेरा ट्रेनमध्ये मुलीने तरुणाला दिली अनोखी शिक्षा
गेल्या काही दिवसांपासून अचानक क्लासेसची दारे बंद करण्यात आली आहेत.क्लासेसच्या प्रशासनाकडून याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती किंवा स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.अनेक विद्यार्थ्यांनी या वर्षासाठी लाखो रुपयांची फी आगाऊ भरली होती.ऐन परीक्षेच्या काळात क्लासेस बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून,त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जाण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे.
"क्लास प्रशासनावर कठोर कारवाई करा आणि.."
परंतु, सुदैवाने अरिहंत कोचिंग क्लासेसकडून या विद्यार्थी विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आपल्या मुलांचे वर्ष वाया जाऊ नये,यासाठी पालकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.यासंदर्भात पालक संघटनांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या भेटीची मागणी केलीआहे.शिक्षण मंत्र्यांनी यात तातडीने हस्तक्षेप करावा आणि क्लास प्रशासनावर कठोर कारवाई करावी आणि पर्यायी व्यवस्था करून द्यावी,अशी मागणी पालकांनी केली आहे.
आमच्या मुलांच्या भविष्यासाठी कष्ट करून मोठी फी भरली.आज शेवटच्या टप्प्यात क्लास बंद करून मुलांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचे देखील काही पालकांच म्हणणं आहे.कोणतीही पूर्वकल्पना न देता रविवारी एक मेसेज करून पालकांना मिटिंग साठी बोलवून ही धक्कादायक माहिती त्यांनी दिली आणि सोबतच शिक्षकांना देखील द्यायला पैसे नसल्याचं काही पालकांच म्हणणं आहे.विद्यार्थ्यांचे होणारे अतोनात नुकसान पाहता शिक्षण मंत्री दादा भुसे यावर काय भूमिका घेतात आणि क्लास प्रशासनावर कोणती कारवाई होते.याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे कारण पालकांनी थेट धाव की शालेय शिक्षण मंत्र्यांकडे घेतली आहे.