मेहबुब जमादार, रायगड
Mumbai-Pune Express Way : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गांवर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. सलग तीन दिवस सुट्ट्यामुळे मुंबई, ठाणे, नवीमुंबई येथून मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर निघाले आहेत. तर काही ठिकाणी शाळांच्या सुट्ट्या सुरु झाल्या असून अनेकजण गावी निघाले असल्याने वाहने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आली आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
खंडाळा टनेलमधून दोन्ही मार्गांवर मुंबईकडे येणाऱ्या मार्गांवर व पुण्याकडे जाणाऱ्या मार्गांवर एकाच मार्गाची पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरु आहे. खंडाळ्यातून मुंबईकडे येणारी वाहतूक एक्सप्रेस वे वर थांबवण्यात आल्याने खंडाळा परिसरात वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहेत.
(नक्की वाचा - : नाशिक हिंसाचार प्रकरणी पोलीस अॅक्शन मोडवर, MIM च्या शहराध्यक्षासह 38 जणांना अटक)
खंडाळा टनेलमधून दोन्ही मार्गांवर पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरु केली आहे. तर मुंबईकडे जाणारी वाहतूक रोखून वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. सकाळपासून पोलीस महामार्गावर उपस्थित असून लवकरच वाहतूक सुरळीत होईल, असं पोलीस म्हणाले.