राहुल तपासे, प्रतिनिधी
Mahabaleshwar Latest News : साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. याठिकाणी बिबट्यासारख्या वन्य प्राण्यांचा वावर वाढला असतानाच आता एका नव्या घटनेनं सर्वाचंच लक्ष वेधून घेतलं आहे. महाबळेश्वरच्या किड्स पॉईंट्सवरून एका 17 वर्षाच्या मुलाने दरीत उडी मारून जीवन संपवलं. भगतसिंह सोळंकी असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. हा तरूण सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथील रहिवासी होता.
महाबळेश्वरमध्ये नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, भगतसिंह जीवन संपवण्यासाठी महाबळेश्वरला आला होता, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याचं लोकेशन ट्रेस करून त्याचा शोध सुरु केला.परंतु, त्याने केटस् पॉइंट्सवरून दरीत उडी मारून स्वत:ला संपवलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड रेस्क्यू टीमला सांगितलं. त्यानंतर त्यांनी या तरुणाचा मृतदेह 400 फूट खोल दरीतून बाहेर काढला. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात पाठवला. भगतसिंहने आत्महत्या का केली?यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
नक्की वाचा >>
महाबळेश्वरच्या परिसरात वन्य प्राण्यांचाही वावर
महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सर्वात बेस्ट पर्यटनस्थळांपैकी एक आहे. हिवाळी हंगामातही महाबळेश्वरला पर्यटक मोठ्या संख्येत भेट देतात. परंतु, मागील काही दिवसांपासून या परिसरात वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याने नागरिकांसह पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. अशातच या तरुणाच्या मृत्यूच्या घटनेमुळं येथील भागात शोककळा पसरली आहे. नागरिकांसह पर्यटकांनी या ठिकाणी फिरताना आपापली काळजी घ्यावी आणि नियमांचं पालन करावं, असं आवाहन येथील प्रशासनाने लोकांना केलं आहे.