Breaking
News

सोलापुरात शरद पवारांची गाडी अडवली, मराठा आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करण्याची मागणी  

उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर मनसेकडून हल्ला झाल्याच्या वृत्तानंतर आज शरद पवारांचा ताफा अडवण्यात आल्याचं वृत्त आहे. मराठा आंदोलकांनी शरद पवारांची गाडी अडवली असून मराठा आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. शरद पवार सोलापूर दौऱ्यावर आहेत. ते बार्शीच्या दिशेने जात असताना काही मराठा आंदोलकांनी त्यांची गाडी अडवली. 

मराठा आंदोलकांनी कुर्डूवाडी येथे शरद पवार यांची गाडी अडवली. मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करावी असा सवाल मराठा समाज बांधवांनी शरद पवारांकडे उपस्थित केला. यावेळी मराठा बांधवाने घोषणाही देण्यात आल्या आहेत. 

This is a breaking news story. Details will be added soon. Please refresh the page for latest version.