मराठी कुटुंबाला मारहाण झाल्याची घटना मुंबईत घडली आहे. मुंबईच्या घाटकोपरमध्ये ही घटना घडली आहे. घाटकोपरच्या रायगड चौक परिसरात हे मराठी कुटुंब राहातं. कुत्रा पाळण्याच्या वादातून ही मारहाण झाल्याचे समोर येत आहे. रविवारी रात्री ही घटना घडली आहे. ही मारहाण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेनं पुन्हा एकदा मराठी विरुद्ध गुजराती असा वाद पेटण्याची शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ही संपूर्ण घटना घाटकोपरमध्ये घडली आहे. इथं रायगड चौक आहे. या भागात मोठ्या प्रमाणात मराठी वस्ती आहे. शिवाय गुजराती समाजाची ही मोठी संख्या आहे. इथं शेजारी शेजारी राहाणाऱ्या मराठी आणि गुजराती कुटुंबामध्ये रविवारी रात्री जोरदार राडा झाला. विशेष म्हणजे मराठी कुटुंबाच्या घरात घुसून मारहाण केल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे. घरात कुत्रा पाळावा की नाही या कारणावरून हा वाद झाला.
ज्यावेळी वाद झाला त्यावेळी एक पुरूष मराठी कुटुंबाच्या दारा समोर जावून वाद घालत होता. त्याच वेळी काही महिला ही त्याच्या बाजून आल्या. त्यांनी जोरजोरात भांडणास सुरूवात केली. पोलिस स्टेशनमध्ये चला असा आवाज ही सीसीटीव्हीमध्ये येत आले. ही भांडणे वाढतच गेली. चाळीत बघणाऱ्यांची गर्दी ही वाढली. ही भांडण इतकी वाढली की मग घरा बाहेर असलेले गुजराती कुटुंब मराठी कुटुंबाच्या घरात घुसले.
त्यानंतर मारहाण झाल्याचे बोलले जात आहे. त्यात मारहाणीचा आवाज सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट पणे ऐकू येत आहे. त्यावेळी पाहाणाऱ्यांची मात्र घरा बाहेर गर्दी झाली. त्यातील कुणी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही. काही वेळाने काही पुरूष तिथे आले. त्यांनी ही भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केल्याचे या सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. आता या मारहाणीचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.