सुजाता द्विवेदी, प्रतिनिधी
Mumbai University's Kalina Campus : मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये एका बौद्ध भिक्षू विद्यार्थ्याला (Buddhist Monk Student) मारहाण करण्यात आल्याचा आरोप झाल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या विद्यार्थ्यावर हल्ला करून त्याचा अपमान केला गेला, तसेच त्याच्याविरोधात खोटी एफआयआर दाखल केल्याचा दावा विद्यार्थी संघटनांनी केला आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या विद्यार्थी आणि सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी विद्यापीठाच्या प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शने केली आणि कुलगुरूंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
कथितरित्या पीडित असलेला हा बौद्ध भिक्षू गेल्या 28 दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी शांततापूर्ण आंदोलन करत होता. विद्यापीठाने या संघर्षाला दडपण्यासाठी त्याच्या विरोधात एक खोटा कट रचला, असा आंदोलकांचा आरोप आहे.
मंत्र्यांची भेट नाकारली....
या विद्यार्थ्याला पूर्व परवानगी मिळूनही केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांना पत्र सादर करण्याची परवानगी नाकारण्यात आली, असा आरोप आहे. त्यामुळे हा वाद आणखी तीव्र झाला. रिजेजू यांच्या स्वीय स्वीय सहाय्यकाद्वारे हे पत्र देण्याची त्याला आधीच परवानगी मिळाली होती, असा अंदोलकांचा दावा आहे.
( नक्की वाचा : Pune University: SPPU चा मोठा निर्णय! पुणे विद्यापीठाच्या परीक्षा फीमध्ये 20% वाढ, आता थेट पेमेंटचा नवा नियम )
या विद्यार्थ्याला ऐनवेळी परवानगी नाकारणे ही भेदभावपूर्ण कृती आहे. एका अल्पसंख्याक बौद्ध भिक्षूचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असा आंदोलकांनी आरोप केलाय.
हा वाद तेव्हा अधिक तीव्र झाला, जेव्हा या भिक्षू विद्यार्थ्याला केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांना पत्र सादर करण्याची परवानगी नाकारण्यात आली. विशेष म्हणजे, मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाद्वारे हे पत्र देण्याची त्याला आधीच परवानगी मिळाली होती. आंदोलकांनी आरोप केला आहे की, ही कृती केवळ भेदभावपूर्ण नसून, एका अल्पसंख्याक बौद्ध भिक्षूचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे.
इतकंच नाही तर कुलकुरुंनी मुख्य सुरक्षा अधिकाऱ्याला विद्यार्थ्यावर शारीरिक हल्ला करण्याची सूचना केली असा आरोप आंदोलकांनी केला. त्यांच्या या आरोपामुळे ही परिस्थिती आणखी चिघळली आणि विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये गोंधळ वाढला.
आंदोलकांच्या मागण्या काय?
- भिक्षू विद्यार्थ्याच्या समर्थनार्थ उतरलेल्या विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांच्या प्रमुख मागण्या:
- या हल्ल्यासाठी कुलगुरूंना थेट जबाबदार धरून त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.
- विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
- भिक्षू विद्यार्थ्याविरुद्ध दाखल करण्यात आलेली खोटी एफआयआर तात्काळ मागे घेण्यात यावी.
विद्यार्थ्यांच्या, विशेषतः अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांच्या, शांततापूर्ण आंदोलनांच्या आणि शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्याच्या लोकशाही अधिकारांचे संरक्षण करावे.
मुंबई विद्यापीठातील हे आंदोलन केवळ कॅम्पसपुरते मर्यादित राहिले नाही. बौद्ध समुदायातील विद्यार्थी, नागरिक आणि विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी या विद्यार्थ्याला पाठिंबा दिला आहे. मनसे विद्यार्थी सेनेचे राज्य सरचिटणीस ॲड. गांगुर्डे संतोष यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. "एका अल्पसंख्याक विद्यार्थ्याला, परवानगी असूनही केंद्रीय मंत्र्यांना भेटण्याचा हक्क नाकारला जातो. उलट, त्याच्यावर हल्ला केला जातो, खोटी माहिती पसरवली जाते आणि खोटी एफआयआर दाखल केली जाते. हे विद्यापीठाच्या प्रशासनाचे अत्यंत निंदनीय कृत्य आहे," असे त्यांनी म्हटले.
हा प्रकार विद्यापीठाच्या कायद्याचे आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) नियमांचे उल्लंघन असल्याचा आरोप त्यांनी केला.