रविवारी 9 जूनला उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. रेल्वे रूळांची दुरूस्ती, सिग्नल यंत्रणा या कामासाठी हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर हा मेगा ब्लॉक असेल. तर हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी - वांद्रे अप डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असेल. त्याच बरोबर पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप-डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर हा मेगाब्लॉक असले. सकाळी 11.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉकमुळे सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील सर्व सेवा जलद मार्गावर वळवण्यात येईल. या सर्व लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला या स्थानकावर थांबतील. विद्याविहारनंतर या लोकल पुन्हा धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.
हेही वाचा - मोठी कारवाई! नारायणपूरमध्ये झालेल्या चकमकीत 7 नक्षलवादी ठार, 3 जवान जखमी
हर्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर हा मेगाब्लॉक असेल. सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असेल. या कालावधीत सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर आणि वाशी अप- डाऊन मार्गावरी लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. शिवाय सीएसएमटी ते गोरेगाव -वांद्रे अप आणि डाऊन मार्गावरील लोकल ही रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत पनवेल - कुर्लादरम्यान विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुख्य आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
हेही वाचा - Ramoji Rao Passed Away: रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन
मध्य आणि हार्बर प्रमाणे पश्चिम रेल्वेवरही मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यानुसार चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप- डाऊन जलद मार्गावर हा मेगाब्लॉक असेल. सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. ब्लॉक काळात जलद मार्गावरील सर्व लोकल चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानका दरम्यान धीम्या मार्गावर चालविण्यात येणार आहेत. शिवाय ब्लॉकमुळे काही लोकल रद्द करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याच बरोबर चर्चगेट लोकलला वांद्रे आणि दादरपर्यंत चालविण्यात येणार आहे.