MHADA Lottery : म्हाडा कोकण मंडळाच्या लॉटरीतील घरांची किंमत झाली कमी! वाचा किती होणार तुमचा फायदा?

या सोडतीतील मौजे शिरढोण (ता. कल्याण, जि. ठाणे) व मौजे खोणी (ता. कल्याण, जि. ठाणे) येथील 6 हजार 248 सदनिकांची (फ्लॅट) विक्री किंमत कमी करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळातर्फे (म्हाडाचा विभागीय घटक) सन 2024 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटातील सदनिकांची किंमत कमी करण्यात आली आहे.  प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर ही सोडत काढण्यात आली आहे.

या सोडतीतील मौजे शिरढोण (ता. कल्याण, जि. ठाणे) व मौजे खोणी (ता. कल्याण, जि. ठाणे) येथील 6 हजार 248 सदनिकांची (फ्लॅट) विक्री किंमत कमी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पात्र लाभार्थ्यांना  आर्थिक दिलासा मिळणार असल्याची माहिती कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी श्रीमती रेवती गायकर यांनी दिली. 

Advertisement

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

किती आहे नवी किंमत?

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल (भा. प्र. से.) यांनी मौजे शिरढोण येथील सदनिकांच्या सुधारित विक्री किंमत प्रस्तावास मान्यता दिली आहे. या मान्यतेनुसार कोकण मंडळाच्या ऑक्टोबर 2024 मधील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेतील ठाणे जिल्ह्यातील  मौजे शिरढोण येथील अत्यल्प उत्पन्न गटातील 5236 सदनिकांची विक्री किंमत प्रती सदनिका 1 लाख 43 हजार 404 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. आता या सदनिकेची सुधारित विक्री किंमत आता 19 लाख 28 हजार 742 रुपये आकरण्यात येणार आहे, असे श्रीमती गायकर यांनी सांगितले.  

Advertisement

( नक्की वाचा : MHADA : मुंबईतील 96 इमारती अतिधोकादायक, म्हाडाकडून घरं रिकामी करण्याची सूचना, वाचा संपूर्ण यादी )
  
 तसेच मंडळाच्या ऑक्टोबर 2024 मधील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावरील मौजे खोणी (ता. कल्याण, जि. ठाणे) येथील अत्यल्प उत्पन्न गटातील 1012 सदनिकांची विक्री किंमत प्रती सदनिका 1 लाख 1 हजार 800 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. या सदनिकेची सुधारित विक्री किंमत आता 19 लाख 11 हजार 700 रुपये असणार आहे.  

Advertisement
Topics mentioned in this article