Mhada Home News: म्हाडाने घर घरेदी करणाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. सर्वांनाच परवडणारी घरे हवी असतात. अशात अनेक ठिकाणी घरांच्या किंमती या गगनाला भिडलेल्या आहेत. अशा वेळी इच्छा असूनही घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होत नाही. अशा सर्व सामान्य लोकांचे घर घेण्याचे स्वप्न म्हाडाच्या माध्यमातून पूर्ण होवू शकते. त्याला कारण म्हणजे म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. म्हाडाची सोडत जाहीर झाल्यानंतर घरांच्या किमती जास्त आहेत, अशी तक्रार करण्यात आली होता. त्याचा आता म्हाडाने गांभीर्याने विचार केला आहे. त्यातूनच घराच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे.
म्हाडाची घरं महाग आहेत, अशी सर्वसामान्यांकडून केली जाणारी नेहमी तक्रार आहे. अशा वेळी म्हाडाने घराच्या किमती कशा कमी होतील याचा विचार केला आहे. त्यानुसार घरांच्या किमतीत ज्या अनावश्यक घटकांची भर पडते, त्याला कैची लावण्यासाठी म्हाडाने एक समिती नेमली होती. त्या समितीचा अहवाल आठवडाभरात म्हाडा प्राधिकरणाला सादर केला जाणार आहे. या अहवालाच्या अनुषंगाने किमती निश्चित केल्यास म्हाडाच्या घरांच्या किमती तब्बल आठ ते दहा टक्क्यांनी कमी होणार आहे. असं झाल्यात घर घेणं सर्व सामान्यांच्या आवाक्यात येईल.
नक्की वाचा -CIDCO News: घरांच्या किंमत कमी करण्याबाबत सिडको सकारात्मक, 22 हजार घरांची लॉटरी ही लवकरच
सामान्यांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध झाली पाहीजेत म्हणून म्हाडा नेहमीच प्रयत्न करत आहे. पण घरांच्या किमती निश्चित करताना रेडिरेकनरच्या दराशिवाय प्रशासकीय खर्च पाच टक्के, बांधकाम साहित्याच्या किमतीतील वाढ पाच टक्के, जमीन घेताना गुंतवलेल्या रकमेवरील व्याज, बांधकाम शुल्क या बाबी सरसकट विचारात घेतल्या जात होत्या. त्यामुळे घरांच्या किमतीत या सर्व बाबींचा 10 ते 15 टक्क्यांहून अधिक वाटा होता. त्याचा परिणाम म्हणून घराच्या किंमती सरसकट वाढताना दिसत होत्या.
अशा स्थितीत घरांच्या किमती कशाप्रकारे कमी होतील, त्याबाबत अभ्यास करून अहवाल तयार करण्यासाठी म्हाडाने उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह तीन जणांची समिती नेमली होती. या समितीच्या निष्कर्षानुसार रेडिरेकनर दराशिवाय ज्या घटकांचा खर्च होईल, त्याच किमतीचा अंतर्भाव केल्यास घरांच्या किमतीत 8 ते 10 टक्क्यांनी कमी होवू शकतात, अशी माहिती म्हाडातील विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. त्याचा सरळ सरळ फायदा सर्वसामान्यांना होण्याची दाट शक्यता आहे. या समितीकइन आठवडाभरात अहवाल सादर केला जाणार आहे त्यानंतर म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.