Balaji Kinikar latest News : अंबरनाथमध्ये शिवसेनेतील वाळेकर-किणीकर संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे.कारण शनिवारी अंबरनाथमध्ये झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी आमदार डॉ.बालाजी किणीकर यांच्यावर टीका केल होती. "आमदार काय करतात,संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात",असं वाळेकर म्हणाले होते. त्यानंतर या टीकेला आमदार बालाजी किणीकर यांनी खळबळजनक प्रत्युत्तर दिलं आहे. "आम्ही कार्यकर्त्यांना गावी पाठवून त्यांच्या बायकांसोबत मिटिंग करत नाही",असं किणीकर यांनी म्हटलंय.त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. s
पुन्हा एकदा वाळेकर आणि किणीकर यांच्यात संघर्षाची ठिणगी
अंबरनाथमध्ये शनिवारी झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना आमदार डॉ.बालाजी किणीकर हे अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्याच्या जीआरवरून फक्त भूलथापा मारत असल्याची टीका शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी केली होती.तर हाऊसिंग बोर्डच्या इमारतींचा पुनर्विकास रखडल्यावरूनही वाळेकरांनी किणीकरांना लक्ष्य करत आमदार काय करतात? फक्त फार्म हाऊसवर जाऊन बसतात,असं विधान केलं होतं.याचवेळी गटनेते रवी करंजुले यांच्यावरही निशाणा साधत अनधिकृत होर्डिंगच्या मुद्द्यावर गटनेते काहीच बोलत नाहीत,असं अरविंद वाळेकर म्हणाले होते.
नक्की वाचा >> Amravati News: राणा दाम्पत्याची चहुबाजूने कोंडी? राणांच्या वर्चस्वाला भाजपचा सुरूंग, अमरावतीत काय-काय घडतंय?
वाळेकर यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वाळेकर आणि किणीकर यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली.वाळेकर यांनी केलेल्या टीकेनंतर आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनीही वाळेकर यांना नाव न घेता प्रत्युत्तर दिलं.ज्या अज्ञानी लोकांना जीआर माहित नसेल त्यांनी त्याचा अभ्यास करावा,तसंच काही लोकांनी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आणि मला तसंच काही नगरसेवकांना निवडणुकीत पाडण्याचा प्रयत्न केला.पण ते पडले नाहीत,उलट जे पडायचे तेच पडले.त्यामुळे लोकांनी तुम्हाला कुवत दाखवली,असं म्हणत आमदार बालाजी किणीकर यांनी आक्रमक शब्दात प्रतिक्रिया दिली.तर फार्म हाऊसच्या टीकेवर बोलताना आम्ही कार्यकर्त्यांना गावी पाठवून त्यांच्या बायकांसोबत मिटिंग करत नाही,असं किणीकर म्हणाले.