​Bullet Train: अखेर तारीख ठरली!'या' दिवशी धावणार देशातील पहिली बुलेट ट्रेन, रेल्वेमंत्र्यांनी दिली खूशखबर

हैदराबाद-मुंबई लिंकमुळे या दोन मोठ्या शहरांमधील प्रवासही अतिशय जलद होणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai Ahmedabad Bullet Train: भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची प्रतीक्षा आता संपणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशातील पहिल्या बुलेट ट्रेनच्या उद्घाटनाची तारीख जाहीर केली आहे. 15 ऑगस्ट 2027 रोजी देशातील पहिली बुलेट ट्रेन रूळावर धावणार आहे. अशी माहिती वैष्णव यांनी दिला आहे. मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडॉर अंतर्गत सर्वात आधी 'सुरत ते बिलीमोरा' या सेक्शन दरम्यान ही ट्रेन सुरू होणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण मार्गावर या सेवेचा विस्तार होईल. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे जवळपास 80 टक्के काम पूर्ण झाले आहे.

​एकूण 508 किलोमीटर लांबीचा हा कॉरिडॉर प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्पाचे काम वेगवान गतीने सुरू आहे. सुरुवातीला सुरत-बिलीमोरा मार्ग सुरू होणार आहे.  त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात वापी-सुरत आणि तिसऱ्या टप्प्यात वापी-अहमदाबाद सेक्शन सुरू होईल. त्यानंतर चौथ्या टप्प्यात अहमदाबाद-ठाणे आणि अंतिम टप्प्यात अहमदाबाद ते मुंबई दरम्यान बुलेट ट्रेन पूर्ण क्षमतेने धावणार आहे. यामुळे दोन्ही आर्थिक केंद्रांमधील दळणवळण सुधारण्यास मदत होईल.

Advertisement

नक्की वाचा - Wari History: वारी म्हणजे काय? वारकरी नेमकं कोणाला म्हणतात? जाणून घ्या रंजक इतिहास

​रेल्वेमंत्र्यांनी आगामी काळातील हाय-स्पीड नेटवर्कच्या विस्ताराचा आराखडाही मांडला आहे. हैदराबादला केंद्रस्थानी ठेवून पुणे-हैदराबाद, हैदराबाद-चेन्नई आणि हैदराबाद-बेंगळुरू या ३ नवीन मार्गांची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय देशात इतर 7 हाय-स्पीड कॉरिडोअर्स प्रस्तावित आहेत. त्यामध्ये मुंबई-पुणे, दिल्ली-वाराणसी, वाराणसी-पटना-सिलिगुडी, आणि बेंगळुरू-चेन्नई या महत्त्वाच्या मार्गांचा समावेश आहे. हैदराबाद-मुंबई लिंकमुळे या दोन मोठ्या शहरांमधील प्रवासही अतिशय जलद होणार आहे.

नक्की वाचा - Ashadhi Wari: वारीच्या वाटेवर टाळ अन् घुंगरूचा संगम! गेल्या 32 वर्षापासून लावणी अन् वारकऱ्याची अनोखी परंपरा

बुलेट ट्रेनची अनेक वर्षापासून भारतीयांना प्रतिक्षा आहे. भारतीयांचे हे स्वप्न आता प्रत्यक्षात येणार आहे. बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा जवळपास पुर्ण झाला आहे. त्यामुळे आता पुढच्या वर्षी 15 ऑगस्टला बुलेट ट्रेन प्रत्यक्षात रुळावरून धावणार आहे. रेल्वे मंत्र्यांनीच या बाबत माहिती दिली आहे. पहिल्या टप्प्यात ही बुलेट ट्रेन गुजरात मधूनच धावणार आहे. मात्र जस जसे काम पुढे होत राहील तशी ती अहमदाबाद ते मुंबई दरम्यान धावेल. त्यामुळे अहमदाबाद मुंबई प्रवास सुसाट होण्यास मदत होणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने ही बुलेट ट्रेन महत्वाची ठरणार आहे.