Mumbai Water Supply : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, 'या' भागात 13 तास होणार पाणीकपात

Mumbai Water Supply : मुंबई शहरातील काही भागांमध्ये 13 तास पाणी कपात केली जाणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Mumbai Water Cut News : बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच ठाणे व भिवंडी - निजामपूर महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पांजरापूर येथील उदंचन केंद्रामधील टप्पा क्रमांक १ येथे नवीन दाबवाढ नियंत्रण टाकी (अँटी सर्ज व्हेसल) कार्यान्वित करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. हे काम बुधवार दिनांक २८ मे २०२५ रोजी सकाळी ९.४५ पासून रात्री १०.४५ वाजेपर्यंत म्हणजेच एकूण १३ तासांसाठी नियोजित आहे. त्यामुळे शहर विभाग आणि पूर्व उपनगरांतील बहुतेक विभागांचा पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे. या १३ तासांच्या कालावधीत शहर विभाग व पूर्व उपनगरांमध्ये १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात‍ येणार आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

तसेच ठाणे व भिवंडी –निजामपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील ज्या भागास बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा होतो त्या भागांसदेखील ही १५ टक्के पाणीकपात लागू राहणार आहे.  

Advertisement

कोणत्या भागांमध्ये होणार पाणीकपात?


१. एफ दक्षिण विभाग– पूर्ण विभाग
२. एफ उत्तर विभाग– पूर्ण विभाग
 
पूर्व उपनगरे:
१. टी विभाग- मुलुंड (पूर्व) आणि (पश्चिम) क्षेत्र
२. एस विभाग- भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग आणि विक्रोळी (पूर्व) क्षेत्र
३. एन विभाग- विक्रोळी, घाटकोपर (पूर्व), घाटकोपर
४. एल विभाग- कुर्ला (पूर्व) क्षेत्र
५. एम पूर्व विभाग– पूर्ण विभाग
६. एम पश्चिम विभाग– पूर्ण विभाग

Advertisement

( नक्की वाचा : MHADA : मुंबईतील 96 इमारती अतिधोकादायक, म्हाडाकडून घरं रिकामी करण्याची सूचना, वाचा संपूर्ण यादी )

 
संबंधित परिसरांमधील सर्व नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाणी काटकसरीने वापरावे, असं आवाहन मुंबई महापालिकेनं केलं आहे.