विशाल पाटील
मुंबई महापालिकेच्या शाळांबाबत वेगवेगळ्या समस्या पुढे येऊ लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी NDTV मराठी ने भांडूप मधील खिंडीपाडा येथील शाळेची स्थिती दाखवल्यानंतर आता अजुन एका शाळेची धक्कादायक बाब समोर आली आहे. आता ही शाळा मुंबईचा सर्वाच उच्चभ्रू भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुलाब्यात आहे. कुलाबा येथील महापालिकेची शाळा गेल्या 1 महिन्यांपासून बंद आहे. कारण इमारत धोकादायक आहे. यामुळे 2000 विद्यार्थी 1 महीन्यापासुन शिक्षणापासून वंचित आहेत. त्यामुळे श्रीमंत असलेल्या मुंबई महापालिकेकडे एका शाळेची दुरुस्ती करण्यासाठी पैसे आहेत की नाहीत असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबई महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. पण याच श्रीमंत महापालिकेच्या शाळेची अवस्था पाहिल्यांनंतर त्यावर कुणालाही विश्वास बसणार नाही. ही खरोखर मुंबई महापालिकेची शाळा आहे का असा प्रश्न उपस्थित होईल. कुलाबा येथील मनपा शाळेची अवस्था सध्या तशी झाली आहे. सध्या या शाळेची इमारत मोडकळीस आली आहे. त्याचसोबत विद्यार्थ्यांचे आयुष्य सुद्धा मोडकळीस आले आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
इमारत धोकादायक आहे म्हणून शाळा बंद करण्यात आली आहे. या शाळेत एक दोन नाही तर तब्बाल 2000 विद्यार्थी शिक्षण घेतात. पण शाळा बंद असल्याने एका झटक्यात या सर्व विद्यार्थ्यांना घरी बसले लागले आहे. मात्र यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. नेमकी चुक कोणाची असे सवाल ही करत पर्यायी व्यवस्था लवकर उभी करावी असा आक्रोश पालक करत आहे. ही शाळा सुरू करावी अशी मागणी पालकांची आहे. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे असं पालकांनी म्हटलं आहे.
Congress News : काँग्रेस पक्षात इन्कमिंगला सुरुवात; शरद पवारांना धक्का
कुलाबा मनपा शाळेची स्थापना 1964 मध्ये झाली होती. या शाळेत दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. इमारतीताची स्थिती सध्या नाजूक आहे. त्यामुळे तात्काळ शाळा बंद करावी लागली होती. मात्र शाळा बंद करताना पर्यायी जागा याबाबत विचार केला गेला नाही. 2000 विद्यार्थ्यांपैकी 200 विद्यार्थ्यांनी दुसऱ्या शाळेत प्रवेश ही घेतला. पर्यायी जागा शोधल्या, मात्र या जागांचे भाडे किमान 16 लाख ते 22 लाखपर्यंत होते. अशा स्थितीत शाळा बंद केली, मात्र विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाचा प्रशासनाला विसर पडला असल्याचा आरोप होत आहे.
नक्की वाचा - Sharad Pawar Vs BJP: शरद पवारांना सगळ्यात मोठा धक्का, अत्यंत जवळचा नेता भाजपमध्ये जाणार
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा हा मतदारसंघ आहे. याच मतदार संघाती ही महापालिकेची शाळा आहे. महापालिका अधिकाऱ्यांसोबत या शाळेची पहाणी करत पर्यायी जागा पाहिल्या, मात्र याला वेळ लागणार आहे. याबाबतीत लवकर तोडगा काढू असं आश्वासन नार्वेकर यांनी दिलं आहे. आधीच 1 महीन्याचे शैक्षणिक नुकसान विद्यार्थ्यांचे झालं आहे. मात्र पर्यायी जागा नसल्यामुळे अजुन किती दिवस जातील याचे ठोस उत्तर कुणाकडेच नाही. त्यामुळे या 2000 विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आहे. याला जबाबदार फक्त महापालिकेतील शिक्षण विभाग आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.