सागर कुलकर्णी
Election Commission: राज्य निवडणूक आयोगाने आज मंगळवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यासाठी पत्रकारांना निमंत्रित करण्यात आले. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा या पत्रकार परिषदेत करण्यात येणार होती. त्यानुसार ती करण्यातही आली. पहिल्या टप्प्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. शिवाय मतदानाची तारीख, दुबार मतदार यांच्याबाबत ही आयोगाने स्पष्टीकरण दिले. मात्र पत्रकार परिषद सुरू असताना एकच गोंधळ उडाला. त्याला कारण होतं त्या पत्रकार परिषदेत बसलेली एक व्यक्ती. या व्यक्तीने प्रश्न विचारला पण त्यानंतर एक गोंधळ उडला. वेळीच पोलीसांनी हस्तक्षेप करत त्या व्यक्तीला ताब्यात घेतले.
नक्की वाचा - नगरपरिषदांसाठी 2 डिसेंबरला मतदान 3 डिसेंबरला मतमोजणी
या व्यक्तीने पत्रकार परिषद सुरू असताना प्रश्न विचारला. प्रश्न निवडणूक चिन्हा बाबत होता. एकाच पक्षांना समान चिन्ह असेल तर काय? याबाबत तो प्रश्न विचारत होता. त्याच वेळी तिथे उपस्थित पत्रकारांनी ही व्यक्ती कोण आहे असा सवाल केला. ही व्यक्ती पत्रकार दिसत नाही असं काहींनी सांगितलं. त्यावर त्या व्यक्तीने आपण पत्रकार नाही हे कबुल केले. मात्र आपण एका उत्तर भारतीय संघटनेचा नेता असल्याचं सांगितलं. त्यामुळे आपल्याला प्रश्न विचारू द्यावा असं ही ते म्हणाले.
पण ही पत्रकार परिषद पत्रकारांसाठी आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यासाठी नाही असं सांगत त्यांच्या हातून माईक काढून घेण्यात आला. यावेळी एकच गोंधळ निर्माण झाला होता. त्याच वेळी पोलीसांनी हस्तक्षेप केला. संबंधीत व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर कुलाबा पोलीस स्थानकात त्याला नेण्यात आले. त्या व्यक्तीला पोलीसांनी ताब्यात घेवून बाहेर नेले. त्यानंतर पुन्हा पत्रकार परिषदेला सुरूवात झाली. यावेळी निवडणूक आयुक्त पत्रकारांच्या प्रश्नांना समोरे गेले.