Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर आजही 'महाट्रॅफिक'; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Mumbai-Pune Expressway Traffic Jam: मुंबई-पुणे वाहतूक कोंडी फोडण्यासाठी टप्याटप्याने ब्लॉक घेतले जात आहेत आणि पुण्याकडे येणारी वाहतूक रोखून मुंबईकडे वाहतूक सोडली जात आहे. मुंबईकडे जाणारी अवजड वाहतूक अद्याप बोरघाटात रोखून धरण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मेहबुब जमादार, रायगड

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाट टॅब हद्दीत गॅस टँकर पलटी झाल्यामुळे झालेली वाहतूक कोंडी अद्याप सुटलेली नाही. टँकरमधील गॅस गळती रोखण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले, तरी सुरक्षिततेच्या कारणास्तव या मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे. त्यामुळे आज दिवसभर पुणे आणि मुंबई या दोन्ही दिशांना प्रचंड ट्रॅफिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहन चालकांनी आपला प्रवास सुखकर करण्यासाठी एक्सप्रेसवे टाळून खालील मार्गांचा अवलंब करावा, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 

मुंबई-पुणे वाहतूक कोंडी फोडण्यासाठी टप्याटप्याने ब्लॉक घेतले जात आहेत आणि पुण्याकडे येणारी वाहतूक रोखून मुंबईकडे वाहतूक सोडली जात आहे. मुंबईकडे जाणारी अवजड वाहतूक अद्याप बोरघाटात रोखून धरण्यात आली आहे. प्रवासी कार आणि हलकी वाहने जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून खोपोलीमार्गे वळवण्यात आली आहेत.

(नक्की वाचा-  Vasai-Virar Mahapalika: वसई-विरारवर 'बविआ'चाच झेंडा! भाजपचा पराभव; अजीव पाटील नवे महापौर)

पर्यायी मार्ग कोणते असतील?

रायगड मार्गे (घाट मार्ग)

>> चांदणी चौक (पुणे) – ताम्हिणी घाट – माणगाव – रायगड मार्गे मुंबईला येता येईल. मात्र हा मार्ग निसर्गरम्य असला तरी वळणावळणाचा असल्याने अवजड वाहनांनी सावधगिरी बाळगावी.

माळशेज घाट मार्गे (ठाणे)

>> पुणे – आळेफाटा – माळशेज घाट – मुरबाड – ठाणे मार्गे मुंबई गाठता येईल. उत्तर पुण्यातील प्रवाशांसाठी हा मार्ग अधिक सोयीचा ठरू शकतो.

(नक्की वाचा-  Mumbai Pune Expressway वरील वाहतूक 15 तासांपासून विस्कळीत; काय आहे सद्यस्थिती?)

महामार्ग सुरक्षा पथक, रायगड परिक्षेत्राचे पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी तैनात आहेत. गॅस टँकर सुरक्षितपणे हटवण्याचे आणि मार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जोपर्यंत गॅस गळतीचा धोका पूर्णपणे टळत नाही, तोपर्यंत मुंबई लेनवरील वाहतूक सुरू करणे धोक्याचे ठरू शकते.