Mumbai-Pune Railway Route: मुंबई-पुणे रेल्वे मार्ग ठप्प, वाचा कोणत्या एक्स्प्रेसवर झाला परिणाम?

Mumbai-Pune Railway Route: मुंबई आणि पुणे रेल्वे मार्ग हा देशातील सर्वात व्यस्त मार्ग समजला जातो. हा मार्ग सध्या ठप्प झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Mumbai-Pune Railway Route: रेल्वे प्रशासन रेल्वे ट्रॅक मोकळा करण्याचा प्रयत्न करत आहे.
मुंबई:

मेहबूब जमादार, प्रतिनिधी

Mumbai-Pune Railway Route: मुंबई आणि पुणे रेल्वे मार्ग हा देशातील सर्वात व्यस्त मार्ग समजला जातो. हा मार्ग सध्या ठप्प झाला आहे. कर्जत आणि पळसधरी येथे पुण्याकडे जाणारी रेल्वे थांबवण्यात आलीय. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. तसंच रेल्वेच्या वेळापत्रकावरही परिणाम झालाय. 

काय आहे कारण?

मुंबई पुणे रेल्वे मार्गांवर खंडाळाजवळ मंकीहील जवळ मालगाडी बोगीची चाके निखळून पडल्याने वाहतूक ठप्प झालीय. रेल्वेच्या सुरक्षा रक्षक बोगी ची चाके निखळून पडल्याने पूण्याकडे जाणारी वाहतूक घाटात थांबविण्यात आली.

मुंबईहुन पूण्याकडे जाणाऱ्या मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर रेल्वे तसंच मालगाड्या कर्जत आणि पळसधरी मार्गांवर थांबविण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासन रेल्वे ट्रॅक मोकळा करण्याचा प्रयत्न करत आहे.

कोणत्या एक्स्प्रेसवर परिणाम?

शुक्रवारी (11 जुलै 2025) दुपारी साधारण 2.30 च्या दरम्यान अपघात झाला होता, परंतु दुरुस्ती पथकची व्हॅन ART (aacidentel relief train ) ही पुण्याहून मागवून सध्या मार्ग मोकळा करण्याचे काम चालू आहे. साधारण रात्री 8 पर्यंत मार्ग पुन्हा सुरु करण्याचे प्रयत्न चालू आहे.

Advertisement

( नक्की वाचा: Mahabaleshwar-Poladpur Road: महाबळेश्वर-पोलादपूर रस्ता 6 दिवस बंद, आंबेनळी घाटात मोठी दरड कोसळली )

अपघातामुळे मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस, जोधपूर हडपसर, कोणार्क एक्सप्रेस ह्या मेल एक्सप्रेस कर्जत आणि पळसधरी येथे थांबविण्यात आल्या असून पनवेल नांदेड मेल कर्जतला येण्या अगोदर थांबविण्यात आली आहे तसेच काही मालगाड्या ही थांबविण्यात आल्या आहेत.

रेल्वे प्रशासनाचे अभियंते, अधिकारी, कामगार या ठिकाणी पावसात ट्रॅक मोकळा करण्याचा प्रयत्न करत आहे.

पुण्याकडे जाताना  अप्पर मिडल लेन वर 118/900 ते 119/000 या 100 मिटर दरम्यान अपघात झाला आहे. यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या दोन्ही ट्रॅक बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक सुरळीत सुरु आहे.

Advertisement
Topics mentioned in this article