RTO News: दुचाकी वाहनासाठी पसंतीचा नोंदणी क्रमांक हवाय? मग RTO ने उपलब्ध करून दिलीय मोठी संधी

आकर्षक नोंदणी क्रमांकांसाठी शासनाने ठरविलेल्या शुल्काची आकरणी केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • RTO मुंबई (पश्चिम) येथे दुचाकी वाहनांच्या नोंदणी मालिकेत MH02GQ मालिका संपुष्टात येत आहे
  • नवीन MH02GR मालिका सुरू होणार असून आकर्षक नोंदणी क्रमांकांसाठी अर्ज प्रक्रिया आरटीओकडून जाहीर करण्यात आली आहे
  • आकर्षक क्रमांकांसाठी निश्चित शुल्क आकारले जाईल.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पश्चिम) येथे दुचाकी वाहनांच्या नोंदणी मालिकेत बदल करण्यात येत आहे.  MH02GQ ही चालू मालिका संपुष्टात येत आहे. नवीन MH02GR मालिका लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे आकर्षक व पसंतीच्या नोंदणी क्रमांकांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आरटीओतर्फे जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियमा नुसार 30 ऑगस्ट 2024 च्या अधिसूचनेनुसार आकर्षक क्रमांक राखून ठेवण्यात आले आहेत. या क्रमांकांसाठी निश्चित शुल्क आकारले जाणार असून त्यासाठी अर्ज प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. 

चालू MH02GQ मालिका 1 डिसेंबर 2025 रोजी संपल्यानंतर आकर्षक क्रमांकासाठी अर्ज स्वीकारले जातील. निर्धारित नमुन्यातील अर्ज आरटीओ मुंबई (पश्चिम) कार्यालयातील आवक-जावक विभागात, तळ मजला, खिडकी क्रमांक 12 रोज सकाळी 10.00 ते दुपारी 2.30 या वेळेत जमा करणे बंधनकारक असेल. अर्जासोबत अर्जदाराच्या पत्त्याचा पुरावा त्यात  आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट इत्यादी यांची स्व-साक्षांकित छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. 

नक्की वाचा - Shocking news: विवाहितेसोबत प्रेम संबध, तिच्या मुलीसोबत शारिरीक संबंध, प्रकरण इतकं वाढलं की शेवटी दोघींनी...

तसेच पसंतीच्या क्रमांकासाठी लागणारे शुल्क राष्ट्रीयकृत बँकेच्या डिमांड ड्राफ्टद्वारे R.T.O. Mumbai West या नावे सादर करणे बंधनकारक आहे. पॅन कार्डची प्रतही जोडावी लागेल. एका क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास त्या क्रमांकांची यादी कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रदर्शित केली जाईल. अशा क्रमांकांसाठी लिलाव पद्धत राबविली जाणार आहे. लिलावासाठी समाविष्ट अर्जदारांनी 2 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 4.30 वाजेपर्यंत विहित शुल्काचा डिमांड ड्राफ्ट उपस्थित राहावे. 

नक्की वाचा - Toll Tax Relief: टोल बाबत नितीन गडकरींनी संसदेत दिली 'गुड न्यूज' म्हणाले आता 1 वर्षात देशात टोल...'

तसेच बोली रकमेचा स्वतंत्र डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात सादर करणे आवश्यक आहे. सर्वाधिक बोली देणाऱ्या अर्जदारास संबंधित आकर्षक क्रमांक देण्यात येईल असे आरटीओकडून जाहीर करण्यात आलं आहे.  आकर्षक नोंदणी क्रमांकांसाठी शासनाने ठरविलेल्या शुल्काची माहिती आरटीओ मुंबई (पश्चिम) कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने  प्रसिद्धापत्रकाद्वारे कळविले आहे.

Advertisement

नक्की वाचा - Solapur News: गर्भवती तरुणी X-ray काढण्यासाठी रुग्णालयात आली, एक्स रे काढण्याच्या नावावर तिच्या सोबत...