- मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या सुमारे अर्ध्या क्षमतेने पाणीसाठा उपलब्ध आहे
- मुंबईकरांच्या दिवसाला सरासरी पाण्याच्या वापरामुळे सध्याच्या पाणीसाठ्याने तीन ते सात दिवस पुरवठा होऊ शकतो
- मुंबईकरांवर सध्या पाणी कपातीचं मोठं संकट आहे
पावसाने सध्या दडी मारली आहे. सुरूवातीला पावसाने जोर धरला होता. धरण क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाला होता. पण सगळी धरणं पुर्ण क्षमतेने भरली नव्हती. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांची ही अशीच स्थिती आहे. त्यामुळे मुंबईकरांवर आता पाणी कपातीचे संकट उभे ठाकले आहे. जुन महिना संपताना साधारणत: ही धरणं भरतात. पण काही दिवस पाऊस झाल्यानंतर त्याने विश्रांती घेतली. त्यामुळे ही धरणे भरली नाहीत. परिणामी पाणी कपातीची टांगती तलवार मुंबईकरांना आहे.
आजच्या घडीला धरणक्षेत्रातील पाणीसाठा 57.75% म्हणजेच 8 लाख 35 हजार 919 दशलक्ष लिटर (ML) पाणी जमा आहे. मुंबईला वर्षभरासाठी 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर (MLD) पाण्याची गरज असते. दिवसाला 4 हजार लिटर पाणी मुंबईकर वापरतात. पूर्ण पाणीसाठ्यातून 1% पाणी साठा तीन दिवसात मुंबईकर वापरतात . सध्या 10% पाणी कपात लागू असून, त्यामुळे 2% टक्के पाणीसाठा 7 दिवस मुंबईला पुरतो.
वर्षभर पाणीकपात कायम राहिल्यास 235 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा सध्या जमा आहे. त्यामुळे पाणीकपात कायम ठेवूनही वर्षभर मुंबईकरांची तहान भागवली जाणार नाही. त्यामुळे मुंबईच्या धरणक्षेत्राला मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. आगामी दोन महिन्यात होणाऱ्या पावसावर पालिकेची भिस्त असणार आहे. पाऊस झाल्यास मुंबईकरांवरील पाणी संकट दुर होईल. पण जर पाऊस झाला नाही तर एक वेगळेच पाणी संकट मुंबईकरांसमोर असेल अशी भिती व्यक्त केली जात आहे.
21 जुलै 2025 रोजी 82.65% टक्के पाणीसाठा मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात उपलब्ध होता. त्याच वेळी 21 जुलै 2024 रोजी 43.41% पाणीसाठी झाला होता हे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. आता पावसाने दडी मारली आहे. तो पुन्हा एकदा येईल आणि मुंबईकरांची तहान भागवेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सर्वांच्याच नजरा पावसाकडे लागल्या आहेत. धरण क्षेत्रात हा पाऊस होणे गरजेचे आहे.
तलावनिहाय जलसाठा
- विहार 100%
- तुळशी 100%
- तानसा 93.22%
- मोडक सागर 86.18%
- भातसा 52.16%
- मध्य वैतरणा 50.21%
- अप्पर वैतरणा 36.41%
आजचा पाऊस मिमी मध्ये
- तानसा 105
- भातसा 100
- अप्पर वैतरणा 96
- विहार 69
- मोडक सागर 67
- तुळशी 48
- मध्य वैतरणा 44