Mumbai Water Metro: मुंबईचं 'स्वप्न' सत्यात! समुद्रातून धावणार मेट्रो;कुणाला होणार फायदा?, वाचा At0 Z माहिती

Mumbai Water Metro Project : मुंबई आणि आसपासच्या शहरांमधील रस्ते आणि लोकल ट्रेनवरील प्रचंड ताण कमी करण्यासाठी आता जलमार्गाचा प्रभावी वापर केला जाणार आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Mumbai Water Metro Project : मुंबईकरांना वकरच समुद्राच्या लाटांवरून जलद प्रवास करणे शक्य होणार आहे.
मुंबई:

Mumbai Water Metro Project : मुंबईकरांच्या प्रवासाचा चेहरामोहरा बदलणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई आणि आसपासच्या शहरांमधील रस्ते आणि लोकल ट्रेनवरील प्रचंड ताण कमी करण्यासाठी आता जलमार्गाचा प्रभावी वापर केला जाणार आहे. महामुंबई क्षेत्रातील वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी जल मेट्रो प्रकल्पाच्या दृष्टीने महाराष्ट्र सागरी मंडळाने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले असून, लवकरच समुद्राच्या लाटांवरून जलद प्रवास करणे शक्य होणार आहे.

काय आहे प्रस्ताव?

मुंबई महानगर क्षेत्रात जल मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी कोची मेट्रो रेल लिमिटेड यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोचीमध्ये यशस्वी ठरलेल्या जल मेट्रोच्या धर्तीवरच मुंबईतही हा प्रकल्प राबवला जाणार आहे. 

या सल्लागार कंपनीने 10 नवीन जलमार्गांचा सविस्तर आराखडा तयार केला असून, तो आता अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाने या प्रकल्पाला गती देण्यासाठी फिजिबिलिटी अहवालाच्या आधारे सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच डीपीआर तयार करण्याचे काम वेगाने सुरू केले आहे.

(नक्की वाचा : Pune News : पुणेकरांनो सुटका झाली, हिंजवडी मेट्रो धावली! 23 किलोमीटर प्रवासातील सर्व स्टेशन्स कोणती? पहा VIDEO )
 

कुठे सुरु होणार जल मेट्रो?

ऑगस्ट 2025 मध्ये सादर करण्यात आलेल्या प्राथमिक अहवालात एकूण 21 ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण, वसई आणि मीरा-भाईंदर या शहरांना जलमार्गाने जोडण्याचा प्रस्ताव आहे. सध्या एमएमआर क्षेत्रात 21 जलमार्गांवर वाहतूक सुरू असून त्याचे अंतर 85 किमी इतके आहे. मात्र, नवीन 10 जलमार्ग सुरू झाल्यानंतर हे जाळे एकूण 200 किमीपर्यंत विस्तारणार आहे. यामुळे प्रवाशांना लोकल आणि मेट्रोसोबतच जल मेट्रोचा एक सक्षम आणि वेगवान पर्याय उपलब्ध होईल.

Advertisement

भविष्यातील लोकसंख्या आणि पर्यावरणपूरक प्रवास

एका अंदाजानुसार, 2030 पर्यंत मुंबई महानगर क्षेत्राची लोकसंख्या 3 कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. अशा वेळी केवळ रस्ते आणि रेल्वेवर अवलंबून राहणे कठीण होणार आहे. जल मेट्रो हा केवळ वाहतूक कोंडी फोडणारा पर्याय नसून तो पूर्णपणे पर्यावरणपूरक असणार आहे. सागरमाला योजना 2.0 अंतर्गत या प्रकल्पासाठी 60 टक्के निधी केंद्र सरकार आणि 40 टक्के निधी राज्य सरकारकडून दिला जाणार आहे.

( नक्की वाचा : Pune News: आता थेट उड्डाणपुलावरून धावणार पुणे मेट्रो; नगर रोडचा प्रवास होणार सुसाट! वाचा सर्व माहिती )
 

या प्रकल्पाबाबत अधिक माहिती देताना सागरी मंडळाने खासदार रवींद्र वायकर यांना लेखी कळवले आहे की, नवीन जलमार्गांच्या आराखड्याचे काम आता शेवटच्या टप्प्यात आहे. मुंबईला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला असून त्याचा वापर प्रवासासाठी केल्यास मुंबईकरांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचणार आहेत. या जल मेट्रोमुळे मुंबई, मीरा-भाईंदर, वसई-विरार, कल्याण आणि ठाणे या पट्ट्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून वाहतूक कोंडीची समस्या बऱ्याच अंशी कमी होईल, अशी आशा वायकर यांनी व्यक्त केली आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article