गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात उकाडा वाढला होता. मुंबईचाही पारा 36 पर्यंत पोहोचला होता. मात्र शनिवारी मुंबईतील पारा कमी झाल्याचं पाहायला मिळालं.
उत्तर भारतातून दक्षिण भारताकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्यांचा वेग वाढला असून याचा परिणामी राज्यासह मुंबईच्या वातावरणावर पाहायला मिळत आहे. शनिवारी मुंबईचे किमान तापमान 16 अंश नोंदविण्यात आले होते. तर पुढील तीन दिवस राज्यासह मुंबईतील नागरिकांना थंडी अनुभवता येणार आहे. हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवसा पूर्वेकडून गरम वारे वाहत आहेत, तर दिवसाचे तापमान अधिक तर रात्रीच्या तापमानात घट पाहायला मिळत आहे.
नक्की वाचा - Fish in Mumbai : मुंबईच्या समुद्रातील मासे गायब का झाले? कारण समजल्यावर बसेल धक्का
पालघर - 12.9
मुंबई - 16.2
ठाणे - 21.2
रत्नागिरी - 18.9
परभणी - 11
नाशिक -10.1
अहिल्यानगर - 7.7
छ. संभाजीनगर - 11.6
डहाणू - 16.7
जळगाव - 9.6
कोल्हापूर - 15.3
महाबळेश्वर - 13.8
नांदेड - 11.2
नंदूरबार - 12.8
धाराशिव - 12.3