कुटुंबीयांचा प्रचंड विरोध, तरीही मुस्लीम मुलीनं हिंदू मुलासोबत संसार थाटला, नंतर जे घडलं..थेट Video शेअर केला

जाहिरात
Read Time: 2 mins
Muslim Girl Viral Video
मुंबई:

Married Muslim Girl Viral Video :  सोशल मीडियावर एका मुस्लीम मुलीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. एक्स मुस्लीम महक (ex_muslim_mahek) नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या महिलेचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या मुस्लीम महिलेनं या व्हिडीओच्या माध्यमातून तिच्या जीवन प्रवासातील महत्त्वाच्या गोष्टींबाबत खुलासा केला आहे. पारंपरिक सूट-सलवार, कपाळावर सिंदूर, लाल चूडा आणि गळ्यात मंगळसूत्र घालून या महिलेनं व्हिडीओ बनवला आहे. 

महक व्हिडीओच्या माध्यमातून सांगते की, एका हिंदू मुलासोबत लग्न करण्याबाबत तिने जेव्हा कुटुंबियांना सांगितलं. तेव्हा कुटुंबियांनी तिला खूप भयभीत केलं. तिने म्हटलं की, लग्नानंतर हिंदू कुटुंब तिला स्वीकारणार नाही. हे कुटुंब त्रासच देईल. लग्नानंतर महकला मारून टाकलं जाईल, अशी धमकीही कुटुंबियांनी दिल्याचा खळबळजनक आरोप महकने केला आहे. 

इथे पाहा त्या विवाहित मुलीचा व्हायरल व्हिडीओ

महकने दिलं सकारात्मक उत्तर 

महकने हसत हसत म्हटलं की, इतर लोकांसोबत काय घडलं, हे मला माहित नाही.पण मी खूप खुश आहे. मला खुश पाहून आता माझं कुटुंबही आनंदी आहे. महिलेनं दिलेल्या या प्रतिक्रियेबाबत सोशल मीडियावर  उलट सुलट चर्चा रंगली आहे. व्हिडीओला हजारो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये नेटकऱ्यांनी प्रेम,स्वाभिमान आणि सन्मानाबाबतचा मेसेजच व्यक्त केला आहे.

नक्की वाचा >> झुकेगा नही..उंच झाडावर बिबट्याने सिंहाला फोडला घाम, फांदी तुटताच गेम पलटला, Video पाहून लोटपोट हसाल

या व्हिडीओत पाहू शकता की, एक व्यक्ती या महेक नावाच्या मुस्लीम मुलीला सांगतो की,लग्नाआधी लोकांनी तुला चुकीचं सांगितलं की, हिंदू सनातनचे लोक असतात ते मुलींचा वापर करतात. त्यांना मारून टाकतात. जेव्हा त्यांना कळलं की तू हिंदू मुलासोबत लग्न करतेस. तेव्हा तुझ्या कुटुंबातील लोक तुला सांगायचे की, हिंदू मुलासोबत लग्न करू नको. यावर महक म्हणते सर्वांनी ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न केला. हिंदू मुलासोबत लग्न करू नको.नंतर अडचणी निर्माण होतील. मी त्यावेळी पॅनिक झाली होती. मला काहीच कळत नव्हतं. बाकी लोकांसोबत काय घडलं,मला माहित नाही. पण आज मी हिंदू मुलासोबत खुश असल्याने माझे कुटुंबीयही खुश आहेत.

Advertisement

नक्की वाचा >> Shirdi News : शिर्डीच्या साईबाबांचा दरबार सजला! भक्ताकडून सोन्याची छत्री अर्पण, 'हा' देखावा पाहण्यासाठी भाविकांची तुफान गर्दी