Pune News : पुण्यात कुठे मिळतं फक्त 10 रुपयात इडली सांबार, तुम्हाला माहितेय का?

नोकरी करणारी सामान्य माणसं घाईगडबीत घरातून बाहेर पडतात आणि प्रवासाचे धक्के खात कसेबसे कार्यालयात पोहोचतात. ऑफिसला वेळेवर पोहोचण्यासाठी अनेकांची सकाळपासूनच मोठी धावपळ सुरु असते.

जाहिरात
Read Time: 2 mins
Nadbramha idli Sambar Stalls In Pune
पुणे:

Naadbramha Idli Sambar In Pune :  नोकरी करणारी सामान्य माणसं घाईगडबीत घरातून बाहेर पडतात आणि प्रवासाचे धक्के खात कसेबसे कार्यालयात पोहोचतात. ऑफिसला वेळेवर पोहोचण्यासाठी अनेकांची सकाळपासूनच मोठी धावपळ सुरु असते. या गडबडीत कोणी घरी नाश्ता करतो,तर कोणी स्ट्रीट फूड खाणं पसंत करतो. वेळेचं नियोजन पाळण्यासाठी काही जण सकाळच्या नाश्यात इडली-सांबारवर ताव मारतात. जसं वडापाव खायला अनेकांना आवडतं,तसंच काहीसं इडली सांबारही खूप लोकांचं फेव्हरेट ब्रेकफास्ट आहे. 

परंतु, महागाईचे चटके बसल्यानंतर लोक स्वस्ताक कुठे काही खायला मिळतं का? याचा शोध घेतात. सामान्यांच्या खिशाला कात्री बसू नये यासाठी पुण्यातील काही ठिकाणी नादब्रम्ह इडली सांबारचे स्टॉल्स आहेत. या स्टॉल्सवर फक्त दहा रुपयांत इडली सांबार मिळतं. जाणून घेऊयात या ठिकाणांबाबतची सविस्तर माहिती.

Advertisement

नक्की वाचा >> Kalyan News: कल्याणमध्ये ‘दृश्यम' सिनेस्टाईल मर्डर; प्रेयसी कोलकात्याला फरार, बाथरूमध्ये मिळाला हत्येचा क्लू

पुण्यात या ठिकाणी मिळतं दहा रुपयांत लुसलुशीत इडली सांबार 

'नादब्रह्म इडली'ही प्रसिद्ध फूड चेन असून पुण्यातही त्यांनी डंका वाजवला आहे. दहा रुपयांत इडली सांबार चटणीसह मिळत असल्याने खवय्यांसाठी ही आनंदाची बाब आहे. पुण्यात नारायणपेठ,वारजे, भोसरी, आकुर्डी, कोथरूड, पौड रोड, कोथरुडवाडगाव शेरी,आनंद पार्क,वाडगाव शेरीदेहू रोड,मेन रोड,देहू रोडयाशिवाय सिंहगड रोड, बाणेर आणि खराडी येथे हे इडली सांबारचे स्टॉल्स असल्याचे समजते. 

नादब्रम्ह इडली या प्रसिद्ध चेनमध्ये खवय्यांना अवघ्या दहा रुपयांत इडली सांबारचा आस्वाद मिळतो. राज्यभरातही या ब्रँडच्या अनेक शाखा आहेत. या स्टॉल्सवर  लुसलुशीत इडली-सांबार दहा रुपयांमध्ये दिलं जात असल्याने नागरिकांसाठी ही समाधानकारक बाब आहे.