Nagpur News : एकाचवेळी अनेकांसोबत शारीरिक संबंधांत वाढ, अविवाहित तरुणींच्या गर्भपाताची घाबरवणारी आकडेवारी

या समस्येमागची कारणे काय आहेत याचा मागोवा घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. काही तज्ज्ञ मंडळींशी आम्ही संवाद साधला आणि त्यातून ज्या गोष्टी निदर्शनास आल्या त्या चिंता वाढवणाऱ्या आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
Nagpur Shocking News : 5 वर्षांत अडीच हजारांपेक्षा अधिक तरुणींनी गर्भपातासाठी रुग्णालय गाठल्याचे निदर्शनास आले आहे
नागपूर:

पाश्चात्य संस्कृतीतील वाईट गोष्टींचा अंगीकार, अतिमोकळेपणा याचे गंभीर सामाजिक परिणाम महाराष्ट्रातील इतर शहरांप्रमाणेच नागपुरातही दिसू लागले आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने एक आकडेवारी जारी केली आहे. यातून तरुणींच्या गर्भपाताचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढल्याचे दिसून आले आहे. महापालिकेने जारी केलेली आकडेवारी पाहिल्यास गेल्या 5 वर्षांमध्ये अंदाजे अडीच हजारांपेक्षा अधिक तरुणी गर्भपातासाठी महापालिका हद्दीतील विविध रुग्णालयात दाखल झाल्याची नोंद सापडली आहे. 

नागपूर महानगर पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ दीपक सेलूकर यांनी NDTV मराठीशी बोलताना सांगितले की, पाच वर्षांत अडीच हजारांहून अधिक अविवाहित मुलींची कुमारी माता म्हणून गर्भपातासाठी नोंद करण्यात आली आहे. या तरुणींचे वय 18 ते 25 वर्षांदरम्यान होते ही आणखीनच धक्कादायक बाब आहे. पाच वर्षांच्या या आकडेवारीवर नजर टाकल्यास दर महिन्याला  गर्भपातासाठी रुग्णालयात येणाऱ्या तरुणींची संख्या ही अंदाजे 30 ते 55 च्या दरम्यान होती. या वर्षी एप्रिल ते मे महिन्यात ही संख्या 75 पर्यंत पोहोचली आहे.  

क्र. कालावधी गर्भपातासाठी आलेल्या तरुणींची संख्या
1 1 जानेवारी 2020 ते मार्च 2021  (15 महिने) 280
2 1 एप्रिल 2021 ते मार्च 2022  (12 महिने) 368
3 1 एप्रिल 2022 ते मार्च 2023 (12 महिने) 511
4 1 एप्रिल 2023 ते मार्च 2024 (12 महिने) 659
5 1 एप्रिल 2024 ते मार्च 2025 (12 महिने) 650
6 1 एप्रिल 2025 ते मे 2025 (1 महिना) 75

समस्येमागचे कारण काय ?

या समस्येमागची कारणे काय आहेत याचा मागोवा घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. काही तज्ज्ञ मंडळींशी आम्ही संवाद साधला आणि त्यातून ज्या गोष्टी निदर्शनास आल्या त्या चिंता वाढवणाऱ्या आहेत. तज्ज्ञांनी सांगितलेली कारणे पुढील प्रमाणे आहेत. 

  • झपाट्याने बदलणारी सामाजिक परिस्थिती
  • युवांची वाढती संख्या
  • शिक्षणासाठी तरुणांचे स्थानांतरण
  • स्थानांतरणामुळे घरची बंधने शिथिल होणे
  • लवकर वयात येणे
  • लग्नाचे वाढते वय
  • मैत्री होण्याचे वाढते प्रमाण 
  • मुलामुलींमध्ये एकत्र फिरण्याचा आणि इतर गोष्टींमध्ये आलेला मोकळेपणा 
  • एकटं जगण्याची लागलेली सवय (individualism)
  • योग्य काय आणि अयोग्य यातील रेष धूसर होणे 
  • आपण चूक करत नाही असे वाटणे  
  • एकाचवेळी अनेक नातेसंबंध ही बाब सामान्य होणे