Tadoba News: ताडोबात वाघोबाला बघणे महागले, टायगर सफारीसाठी आता द्यावे लागणार...

ही शुल्क वाढ विशेषतः सामान्य पर्यटक आणि वाघ पाहण्याची इच्छा असलेल्या लोकांना थोडे अधिक प्रभावित करेल.

जाहिरात
Read Time: 3 mins
नागपूर:

संजय तिवारी 

विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबाच्या कोअर (Core) आणि बफर (Buffer) क्षेत्रात वाघ बघण्यासाठीच्या सफारीचे शुल्क वाढले आहे. त्यामुळे या सफारीसाठी आता प्रत्येक पर्यटकाला एकूण एक हजार रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत.  प्रवेश शुल्कात प्रत्येकी 600 रुपये, गाईड शुल्कात 100 रुपये आणि वाहन शुल्कात 300 रुपये प्रति पर्यटक अशी वाढ करण्यात आली आहे. हे नवे वाढीव दर येत्या 1 ऑक्टोबर पासून लागू होणार आहेत. या दर वाढी मुळे प्राणी प्रेमींमध्ये समिश्र प्रतिक्रीया उमटली आहे. त्यामुळे या दरवाढीनंतर किती पर्यटक टायगर सफारीसाठी येतात हे पुढील महिन्यात स्पष्ट होणार आहे. सफारी महाग झाली असल्याने त्याचा परिणाम कितपत होतो, ते पुढील महिन्यापासून समजेल. त्यातील पुढेल चार महिने हा सिजन असतो. या काळात पर्यटक ताडोबाला येत असतात.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात (TATR) वाघ सहज दिसत असल्याने तो देश विदेशातील वन्य प्रेमी पर्यटकांना नेहमी आकर्षित करतो. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात माया, मटकासुर, सोनम, मधु, छोटा मटका आणि छोटी मधु अशा कित्येक वाघांच्या विषयी चर्चा राहिली आहे.  या सर्व वाघांचा आपला असा फॅन बेस राहिला आहे. मात्र व्यवस्थापन कोट्यातंर्गत हे शुल्क वाढवल्यामुळे आता सफारी थोडी महाग झाली आहे.  त्याचा परिणाम सामान्य वन्य पर्यटकांना जाणवेल. याविषयी टी. ए. टी. आर. चे संचालक डॉ प्रभुनाथ शुक्ल यांना विचारले असता त्यांनी  गरजेनुसार वेळोवेळी सफारी शुल्क वाढवण्यात येतात. यापूर्वी देखील वाढ करण्यात आली होती. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या संकेत स्थळावर त्याची रीतसर नोंद देखील करण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले.

नवे दर कसे आहेत? 

 कोर म्हणजे गाभा क्षेत्रात सोमवार ते शुक्रवार प्रत्येकी 

  • 1.आधी प्रवेश शुल्क 4 हजार रुपये होते त्यात 600 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
  • 2.मार्गदर्शक म्हणजे गाईड शुल्क 600 रुपये होते ते आता 700 रुपये असतील.
  • 3.वाहन शुल्क 3 हजार रु. होते, त्यात 300 रुपये वाढ करण्यात आली आहे.
  • 4.एकूण शुल्क सात हजार सहाशे रुपयांवरून एक हजार वाढले आहेत. आता आठ हजार सहाशे रुपये पडतील.

कोर म्हणजे गाभा क्षेत्रात शनिवार आणि रविवार प्रत्येकी :

  • 1.आधी प्रवेश शुल्क 8 हजार रुपयांवर होते त्यात देखील 600 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ते आता 8,600 रुपये असतील.
  • 2.गाईड शुल्क 600 वरून 700 रुपये करण्यात आले आहेत.
  • 3.वाहन शुल्क 3 हजारांवरून 3 हजार 300 रुपये करण्यात आले आहेत.
  • 4.एकूण, 11 हजार 600 रुपयांऐवजी 12 हजार 600 रुपये पडतील.

बफर क्षेत्रात सोमवार ते शुक्रवार प्रत्येकी :

  • 1.आधीच्या 3 हजार रुपयांऐवजी 3 हजार 600 मोजावे लागतील.
  • 2.गाईड शुल्क 600 रुपये ऐवजी 700 रुपये द्यावे लागतील.
  • 3.वाहन शुल्क आधीच्या 2 हजार 700 ऐवजी 3 हजार रुपये असेल.
  • 4.एकूण, 6 हजार 300 ऐवजी 7 हजार 300 रुपये मोजावे लागतील.

बफर क्षेत्रात शनिवार आणि रविवारी प्रत्येकी :

  • 1.प्रवेश शुल्क 6 हजार रुपये होते. आता 6 हजार 600 रुपये असतील.
  • 2.गाईड शुल्क 600 रुपये ऐवजी 700 रुपये द्यावे लागतील.
  • 3.वाहन शुल्क आधीच्या 2 हजार 700 ऐवजी 3 हजार रुपये असेल.
  • 4.एकूण, 9 हजार 300 ऐवजी आता 10  हजार 300 रुपये मोजावे लागतील.

ही शुल्क वाढ विशेषतः सामान्य पर्यटक आणि वाघ पाहण्याची इच्छा असलेल्या लोकांना थोडे अधिक प्रभावित करेल. याचा साधा अर्थ असा की ज्या कुटुंबांना ताडोबात सफारी करायची असेल, त्यांना प्रत्येक पर्यटकाला आता एकूण साधारण 1 हजार रुपये जास्त पैसे मोजावे लागतील. थोडक्यात, 1 ऑक्टोबरपासून नवीन दर लागू होणार असल्याने सामान्य कुटुंबांना वाघ पाहण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी  प्रत्येकी एक हजार रुपये जास्त मोजाव लागणार आहे.