Mahakumbh 2025 : प्रयागराजमध्ये होणाऱ्या 'महाकुंभाच्या ' (Mahakumbh) निमित्तानं झालेल्या NDTV कॉन्क्लेवमध्ये देशातील दिग्गज संत आणि अर्थशास्त्रज्ञ एकाच स्टेजवर उपस्थित होते. या सर्वांनी महाकुंभाची आर्थिक बाजू आणि त्यामधून निर्माण होणाऱ्या संधी या विषयावर त्यांची विचार मांडले. ''प्रकृति पर आस्था का महाकुंभ' या सत्रामध्ये दिव्य ज्योती जागृती संस्थानाचे हेड ऑफ प्रोग्राम स्वामी विशाल आनंद सहभागी झाले होते. त्यांनी कुंभमेळा आणि आध्यात्मिक पर्यटन यांच्यातील नातं उलगडून सांगितलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मेळ्याचा अर्थ काय?
स्वामी विशाल आनंद यांनी महाकुंभमेळ्याबाबत बोलताना वर्ल्ड कप आणि अन्य कार्यक्रमांच्या आयोजनाचं उदाहरण दिले. 'या कार्यक्रमाचे दीर्घकालीन परिणाम दिसतात. मेळा म्हणजे लोकांचे भेटीगाठी. त्यांच्यामध्ये नव्यानं संबंध निर्माण होणे. जिथं नव्यानं संबंध निर्माण होतात, नवी चर्चा होते. नव्यावं सहकार्य सुरु होतं. या सर्व गोष्टी सतत सुरु असतात. त्या पुढे सरकत असतात. महाकुंभचा देशाच्या आध्यात्मिक पर्यटनाला नवा आयाम मिळेल.'
महाकुंभ हिंदुस्तानच्या आध्यात्मिक वैभावाचं प्रतीक आहे. गेल्या काही वर्षात आध्यात्माशी संबंधित व्यवसायात मोठी वाढ झाली आहे. त्याचा आणखी विस्तार कसा होऊ शकतो? या प्रश्नाला उत्तर देताना स्वामी विशाल आनंद यांनी सांगितल, 'तुम्ही याला व्यवसाय म्हणता पण, ही आपली संस्कृती आहे. मोठे महात्मा कुंभमध्ये जाण्यानं, टेंट लावणे, टेंटचे भाडे, अनेकांचे कथावाचन हा सर्व व्यवसाय असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले हा सर्व पर्यटनाचा भाग आहे. पण, त्याला वेगळ्या पद्धतीनं बघितलं पाहिजे.
( नक्की वाचा : Mahakumbh Conclave : 'महाकुंभाचा फक्त प्रयागराजला नाही तर संपूर्ण देशाला फायदा' )
तुम्ही आपल्या संस्कृतीचा मागोवा घेतला तर आपल्या कोणत्याही देवी-देवतांचे फोटो फाटलेले दिसणार नाहीत. सर्व हिरे-दागिन्यांनी भरले आहे. ही आपली अर्थव्यवस्था आहे. भारताला उगाच 'सोने की चीडिया' असं म्हटंल जात नाही.
आपल्या वेदांनुसार संपत्तीवर पहिला आणि शेवटचा अधिकार फक्त देवाचा आहे. त्या साधनांचता उपयोग देवासाठी केला पाहिजे. खनन आणि शोषण ही भारताची संस्कृती आणि परंपरा नाही. ती बाहेरुन आली आहे. रताची परंपरा ही निसर्गातून निर्माण करून निसर्गालाच अर्पण करण्याची आहे.
( नक्की वाचा : Mahakumbh Mela 2025 : महाकुंभ मेळ्यात कधी होणार शाही स्नान? वाचा संपूर्ण वेळापत्रक आणि महत्त्व )
कुंभची स्पलाय चेन
भारताच्या परंपरेतून रोजगार कसा वाढू शकतो हे सांगताना स्वामी विशालनंद यांनी सांगितलं की, 'महाकुंभमुळे अनेकांना रोजगार मिळत आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटनात वाढ होणार आहे. 45 दिवसांच्या कार्यक्रमात 13 हजार नव्या रेल्वे चालवल्या जातील. या महाकुंभला डिजिटल कुंभ असं म्हंटलं जात आहे. त्याचा संबंध फक्त संगणकाशी नाही. रेल्वेची सेवा देण्यासाठी सर्व तंत्रज्ञान वापरले जात आहे. त्यामुळे कनेक्टिव्हिटी निर्माण होत आहे. उत्तर प्रदेशत राज्य महामार्ग बनवण्यात आले आहेत. कितीतरी लोकं या मार्गाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जोडली गेली आहे. हॉटेल व्यवसायाचाही यामध्ये समावेश ाहे. ही संपूर्ण स्पलाय चेन आहे.