Pune News : पुणे विमानतळावरुन 'या' 5 शहरांसांठीची उड्डाणं रद्द, कधीपासून होणार सुरू?

जम्मू-काश्मीर, अमृतसरसह देशातील 26 विमानतळं 10 मेपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यातून सुटणारी काही उड्डाणंही रद्द करण्यात आली आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानमधील शहरांवर 'एअर स्ट्राइक' केल्यानंतर देशातील सीमेजवळ असलेले विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पाच शहरांसाठीची विमानसेवा बुधवारी रद्द करण्यात आली आहे. या विमानांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकिटाची रक्कम परत किंवा पर्यायी मार्ग निवडण्याची सुविधा देण्यात आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

पुणे विमानतळावरून अमृतसर, राजकोट, जोधरूर, किशनगड, चंडीगड शहरांसाठी थेट विमान सेवा सुरू आहे. या शहरांसाठीच्या विमान सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. भारतीय लष्कराने बुधवारी पहाटे 'ऑपरेशन सिंदूर' राबविल्यानंतर या पाच शहरांमधील विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी बुधवारी सकाळपासून 10 मे पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

नक्की वाचा - Operation Sindoor: 'सुसाईड ड्रोन'ने उडवली पाकिस्तानची झोप! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये वापर

पुणे विमानतळावरून ही उड्डाणे रद्द

पुणे - अमृतसर

पुणे - चंडीगड

पुणे - किशनगड

पुणे - राजकोट

पुणे - जोधपूर

जम्मू-काश्मीर, अमृतसरसह देशातील 26 विमानतळं 10 मेपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय 430 हून अधिक उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून भारताने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या प्रवाशांचे यादरम्यान तिकीट बुकिंग होते, त्यांना रिफंड देण्यात येणार आहे. तर प्रवासी पुढील दिवसात बुकिंग करू शकतात अशी माहिती विमान कंपन्यांकडून देण्यात आली आहे. 

कोणती विमानतळं बंद राहणार...

  1. श्रीनगर
  2. जम्मू
  3. लेह
  4. चंदीगढ
  5. अमृतसर
  6. लुधियाना
  7. पटियाला
  8. भटिंडा
  9. हलवारा
  10. पठाणकोट
  11. भुंतर
  12. शिमला
  13. गग्गल
  14. धर्मशाला
  15. किशनगढ
  16. जैसलमेर
  17. जोधपूर
  18. बिकानेर
  19. मुंद्रा
  20. जामनगर
  21. राजकोट
  22. पोरबंदर
  23. कांडला
  24. केशोद
  25. घोडन
  26. भुजवान