Javed Akhtar: 'आता आरपारची वेळ, पाकिस्तानला अशी अद्दल घडवा की..., जावेद अख्तर थेट बोलले

पाकिस्तान काश्मीरींबाबत नेहमीच एक खोटा प्रचार करत आले आहेत, असं अख्तर यावेळी म्हणाले.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

आता ठोस अॅक्शन घ्या. सीमेवर छोट्या मोठ्या गोष्टी करुन काही होणार नाही. आता कठोर पाऊल उचला. असं काही सॉलिड करा की, ज्याने पाकिस्तानला कायमची अद्दल घडेल. आता आरपारची वेळ आलीय, अशा भावना गीतकार जावेद अख्तर यांनी व्यक्त केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या गौरवशाली महाराष्ट्र या कार्यक्रमात ते बोलत होते. काश्मीरी हे हिंदूस्तानी आहेत. त्यांच्या मनात भारत आहे असं ही त्यांनी ठाम पणे यावेळी सांगितले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर जावेद अख्तर यांनी आपली परखड मत मांडले. डोंबिवलीचे तिघे जण या हल्ल्यात मृत्यू पावले. हे कधी ही विसरू नका. ही गोष्ट साधी नाही. मुंबई आणि मुंबईकरांवर दहशतवाद्यांची वाकडी नजर आहे. ते तिथे फिरायला गेले होते. निसर्गाचा आनंद घ्यायला गेले होते असं अख्तर यावेळी म्हणाले. भारताने तुमचं काय बिघडलं आहे असा प्रश्नही त्यांनी पाकिस्तानला केला. पण आता ठोस अॅक्शन घेण्याची वेळ आली आहे. सीमेवर छोट्या मोठ्या गोष्टी करुन काही होणार नाही. आता कठोर पाऊल उचला. असं काही सॉलिड करा की, ज्याने पाकिस्तानला कायमची अद्दल घडेल. आता आरपारची लढाई करा असं ही अख्तर यावेळी म्हणाले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Pahalgam attack: चुन-चुन कर मारेंगे! अमित शाहंनी दहशतवाद्यांना ठणकावले

ज्यावेळी आपण लाहोरला गेलो होतो त्यावेळी आपण त्यांना आरसा दाखवला होता. भारत आम्हाला नेहमी दोष देतो. त्यांना पाकिस्तानी म्हणजे दहशतवादी वाटतात असं आपल्याला विचारलं गेलं. त्यावर मी मुंबईत राहातो. मी माझं शहर जळताना पाहिलं आहेत. ते जाळण्यासाठी आलेले स्विडन किंवा इजिप्तवरून आले नव्हते. ज्या लोकांनी हे केलं तेच लोक आज तुमच्या शहरात खुलेआम फिरत आहेत असं आपण सुनावलं होतं असं ही अख्तर यावेळी म्हणाले.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Pahalgam attack: पहलगाम हल्ल्याचा मोठा पुरावा लागला हाती, पाकिस्तानचं थेट कनेक्शन आलं समोर

या आधी ही पाकिस्तानने कुरापती काढल्या आहेत. कारगीर आम्ही केलं नाही असं पाकिस्तान सांगतं. 1948 चा हल्ला स्थानिक आदिवासींनी केला होता असं ते सांगतात, आता ही त्यांनी तिच भूमीका आहे. आम्ही केलं नाही. कारगील युद्धत याच पाकिस्तानने त्यांच्या सैनिकांचे मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. जे आपल्या सैन्याचा सन्मान करू शकत नाहीत त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार असं ही ते म्हणाले. यांना कायमची अद्दल घडवणे गरजेचे आहे. त्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचं त्यांनी सांगितलं. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Big News: महाबळेश्वरला जाण्याचा प्लॅन करताय? थांबा! त्या आधी ही बातमी नक्की वाचा

पाकिस्तान काश्मीरींबाबत नेहमीच एक खोटा प्रचार करत आले आहे.  ते म्हणतात काश्मीरी लोकांच्या मनात पाकिस्तान आहे. भारताने काश्मीरवर कब्जा केला आहे. हे सर्व साफ खोटं आहे. खरं तर ज्या वेळी 1948 ला काश्मीवरवर पाकिस्तानने पहिल्यांदा हल्ला केला होता त्यावेळी त्यांना विरोध स्थानिक काश्मीरींनी केला होता. आपली फौज ही तीन दिवसानंतर काश्मीरमध्ये पोहोचली होती असं अख्तर यांनी सांगितले. त्यामुळे काश्मीरी हे सच्चे हिंदूस्तानी आहेत. ते भारताचे वफादार आहेत. 99 टक्के काश्मीरींच्या मनात भारत आहे असं ही अख्तर यावेळी म्हणाले.