Palghar News : डहाणू ते लंडन लव्ह जिहादचे भयंकर कनेक्शन! हिंदू मुलींना जाळ्यात ओढणाऱ्या नेटवर्कची Inside Story

Dahanu Love Jihad Case  : पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि बोर्डी परिसरातून दोन मुली मुस्लिम तरुणांसोबत थेट लंडनला पोहोचल्याची एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे

जाहिरात
Read Time: 3 mins
Dahanu Love Jihad Case : आपली मुलगी थेट लंडनला गेल्याचं समजताच पालकांना धक्का बसला. (प्रतिकात्मक फोटो)
डहाणू:

सुजाता द्विवेदी, प्रतिनिधी

Dahanu Love Jihad Case : पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि बोर्डी परिसरातून दोन मुली मुस्लीम तरुणांसोबत थेट लंडनला पोहोचल्याची एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमाच्या जाळ्यात ओढून, गुप्तपणे लग्न करून आणि पद्धतशीरपणे ब्रेनवॉश करून मुलींना थेट परदेशात पाठवण्यामागे एक मोठे आंतरराष्ट्रीय रॅकेट कार्यरत असल्याचा संशय आता व्यक्त केला जात आहे. 

या संपूर्ण प्रकरणाची संवेदनशीलता आणि गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी थेट एसआयटी म्हणजेच विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर डहाणू शहरामध्ये प्रचंड संताप आणि कायदेशीर कारवाईसाठी मोठा उद्रेक पाहायला मिळत आहे.

Advertisement

काय आहे प्रकरण?

डहाणू आणि बोर्डी येथील दोन युवत्या अचानक मुस्लिम तरुणांसोबत लंडनला पोहोचल्या आणि कुटुंबीयांनी वारंवार विनंती करूनही त्यांनी भारतात परतण्यास स्पष्ट नकार दिला. या प्रकरणाला आता आर्थिक आणि मानवी तस्करीचा म्हणजेच ह्युमन ट्रॅफिकिंगचा कोन असल्याचे बोलले जात आहे. या मुलींना लंडनला पाठवण्यासाठी आणि त्यांच्या स्टुडंट व्हिसासाठी एवढा मोठा खर्च नेमका कोणी केला, असा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

ज्या संबंधित तरुणांची आर्थिक परिस्थिती अत्यंत सामान्य आहे, त्यांच्याकडे परदेशात शिक्षण आणि राहण्याचा खर्च कुठून आला, याचा शोध आता तपास यंत्रणा घेत आहेत.

( नक्की वाचा : पालघरच्या हिंदू मुलींना फूस लावून थेट लंडनला पाठवण्याचे मोठे रॅकेट? 2 सख्ख्या बहिणींच्या छळानंतर खळबळजनक आरोप )

पीडित मुलीच्या भावाने मांडली विदारक व्यथा

पीडित मुलीच्या भावाने या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत विदारक माहिती NDTV मराठी ला बोलताना सांगितली.  बहिणीने लंडनला जाण्याची संपूर्ण योजना अत्यंत गुप्त ठेवली होती आणि घरच्यांना याची पुसटशी कल्पनाही येऊ दिली नाही, असे भावाने सांगितले. लंडनला पोहोचल्यानंतर तिने थेट फोन करून, आता तुम्ही माझे काहीही बिघडू शकत नाही, असे कुटुंबीयांना सुनावले. 

बहिणीचा इतक्या मोठ्या प्रमाणावर ब्रेनवॉश करण्यात आले आहे की, तिने 22 वर्षे ज्या कुटुंबाने तिला लहानाचे मोठे केले, त्यांनाच आपले मानण्यास नकार दिला आहे.

Advertisement

गुजरातच्या सीमेवरून तरुण पालघर आणि डहाणू भागात येऊन अशा प्रकारे विवाह करतात, कारण इथे न्यायालयाच्या प्रक्रियेची माहिती कुटुंबाला तातडीने मिळत नाही, असा गंभीर आरोपही भावाने केला आहे. गुजरातमध्ये कोर्ट मॅरिज करताना घरच्यांना कल्पना मिळते, पण इथे तसे होत नाही. मुलांप्रमाणेच मुलींच्या विवाहाचे किमान वयही 21 वर्षे असावे आणि सरकारने त्याच्या बहिणीला सुरक्षित भारतात परत आणावे, अशी मागणी त्याने केली आहे. आमच्या 22 वर्षांच्या प्रेमाची काय चूक होती, असा उद्विग्न सवाल त्याने केला आहे.

( नक्की वाचा : Shirdi News: 'बीफ खाल्ल्यावर गोरं होतं आणि नमाज...' शिर्डीत 15 वर्षांच्या मुलीचा लग्नासाठी छळ, वाचा सविस्तर )

डहाणू परिसरातील मुलींना टार्गेट करण्याचा संशय

या संपूर्ण प्रकरणाच्या मागे एक मोठे नेटवर्क कार्यरत असल्याचा संशय आहे, जेथील स्थानिक आणि चांगल्या कुटुंबातील मुलींना जाणीवपूर्वक टार्गेट करत आहे. प्रेमाचे नाटक करून मुलींना फूस लावून पळवणे आणि नंतर त्यांचे शोषण करणे, अशी ही एक मोठी साखळी असल्याचे बोलले जात आहे. 

Advertisement

डहाणूमध्ये यापूर्वी घडलेल्या एका घटनेत दोन सख्ख्या हिंदू बहिणींना जाणीवपूर्वक प्रेमाच्या जाळ्यात ओढून, त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचाही आरोप समोर आला होता.

एसआयटी तपास सुरू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर आता एसआयटी या प्रकरणाच्या डहाणू ते लंडन कनेक्शनचा सखोल तपास करत आहे. या प्रकरणात मानवी तस्करी आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक मदतीचे धागेदोरे शोधण्यासाठी गुन्ह्यामध्ये अधिक कडक कलमे जोडण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे. 

या नेटवर्कच्या मागे नेमके कोणकोणते चेहरे आहेत आणि परदेशात मुलींना पाठवण्यासाठी पैसा कुठून पुरवला जात आहे, याचा तपास आता वेगाने सुरू आहे.
 

Topics mentioned in this article