- डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्या प्रकरणात अनंत गर्जे यांच्या जुन्या प्रेयसीचा वरळी पोलिसांनी जबाब नोंदवला आहे
- गौरीने आत्महत्या करण्यापूर्वी पती अनंत गर्जे यांच्या अफेअरसंबंधाबाबत कुटुंबीयांना माहिती दिली होती
- प्रेयसीने पोलीसांना सांगितले की 2022 पासून अनंत गर्जे यांच्याशी तिचा कोणताही संबंध नव्हता
डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणात पोलीसांनी आता एफआयरमध्ये नाव नमूद असलेल्या अनंत गर्जे यांच्या जुन्या प्रेयसीचा जबाब नोंदवला आहे. वरळी पोलिसानी हा जबाब नोंदवला आहे. त्यात काही धक्कादायक माहिती ही समोर आली आहे. तर दुसरीकडे अनंत गर्जे याची पोलीस कोठडी संपत असताना त्याला कोर्टात हजर करण्यात आले होते. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
गौरी पालवे हिला आत्महत्ये पूर्वी तिला काही कागदपत्र मिळाली होती. त्यात एका महिलेचे नाव होते. त्यात पतीचे नाव म्हणून अनंत गर्जे याचा उल्लेख होता. हाच अनंतर गौरीचा ही पती होता. तर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा पीए होता. ती कागदपत्र गर्भपाताची होती. हे सर्व पाहून गौरी हादरली होती. त्यानंतर ही तिने सबूरीने घेतलं होतं. पण त्यानंतर ही अनंत चे त्या महिले सोबत संबंध असल्याचेही गौरीला समजले होते. त्यामुळे तिने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली.
आत्महत्ये पूर्वी आपल्या पतीच्या अफेअरबाबत तिने आपल्या कुटुंबीयांना माहिती दिली होती. त्याच आधारे तक्रार ही दाखल करण्यात आली. ज्या प्रेयसीसाचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला होता, तिला वरळी पोलीसांनी चौकशीसाठी बोलावले होते. त्यामुळे तिच्या चौकशीत काय समोर येतं याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. तिने पोलीसांना दिलेल्या जबाबात काही गोष्टी स्पष्ट केल्या आहे. तिने 2022 पासून आपला आणि अनंतचा काही एक संबंध नव्हता असं सांगितलं आहे. आपण त्यांच्या संपर्कातही नव्हतो असं तिने सांगितलं. शिवाय गौरीला घरी सापडलेल्या कागदपत्रांबद्दल काहीही कल्पना नाही असं ही तिने स्पष्ट केलं आहे.
दरम्यान गौरीच्या आत्महत्येच्या दिवशी अनंतच्या शरीरावर काही जखमा आढळल्या होत्या. त्या जखमांबद्दलही मोठी माहिती समोर आली आहे. अनंतने खिडकीतून आतमध्ये प्रवेश करताना त्याच्या शरीरावर किरकोळ जखमा झाल्या होत्या. त्यानंतर अनंत गौरीला घेऊन पोतदार रुग्णालयात गेला होता. तेव्हा गौरी मृत झाल्याचे त्याला सांगण्यात आले. त्यानंतर त्याने स्वताचे डोके भिंतीवर आपटण्याचाही प्रयत्न केला होता. पोतदार रुग्णालयात अनंत स्वतःला मारून घेतानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. आता अनंत गर्जेची मानसशास्त्रीय तपासणी होणार आहे. अनंत गरजेची पॉलीग्राफ टेस्ट करणे आवश्यक असल्याचं पोलिसांनी कोर्टात सांगितलं. सध्या त्याला कोर्टाने चौदा दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.