Traffic Jam: जुना पुणे–मुंबई महामार्गावर पनवेल टोल नाक्यावर राडा, गाड्यांच्या 2 किलोमीटर पर्यंत रांगा

त्यामुळे टोलनाक्यावर एकच गोंधळ उडाला. या गडबडीत अनेक वाहनं टोल न देताच गेली.

जाहिरात
Read Time: 2 mins
पनवेल:

राहुल कांबळे 

काही दिवसापूर्वी मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर गॅसचा टँकर पलटी झाला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. ही घटना ताजी असताना आता जुन्या मुंबई पुणे हायवेवर टोलनाक्यावर राडा झाला आहे. या टोलनाक्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. दोन किलोमिटर पर्यंत गाड्यांच्या रागा लागल्या होत्या. त्यामुळे संतप्त झालेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या पनवेल जवळील टोलनाक्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यामुळे टोलनाक्यावर एकच गोंधळ उडाला. या गडबडीत अनेक वाहनं टोल न देताच गेली.   

पनवेल जवळ शेडूंग टोल नाका आहे. या टोलनाक्यावर वारंवार वाहतूक कोंडी होते. याबाबत मनसेचे वाहतूक सेना सरचिटणीस संतोष गायकवाड यांच्याकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार त्यांनी आज याबाबत आढावा घेतला. त्यावेळी तिथे मोठ्या प्रमाणात गाड्यांची राग पाहायला मिळाली. गायकवाड यांच्या मते जवळपास एक ते दोन किलो मिटर पर्यंत गाड्यांच्या रागां होता. ते आणि त्यांचे कार्यकर्ते त्याच वेळी पनवेल इथल्या टोलनाक्यावर धडकले. 

Advertisement

नक्की वाचा - Ajit Pawar Death : 'पायलटने Mayday कॉल दिला नाही,त्याला टेकऑफ नंतर..', विमान अपघाताचा नवा ट्वीस्ट समोर

त्यांनी तातडीने गाड्या सोडण्यास सांगितले. त्यावेळी थोडी बाचाबाची झाली. शिवाय कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत गाड्यांना टोल न भरताच सोडले.अनेक गाड्या त्यावेळी टोळ न भरतात पुढे सुसाट निघाल्या. मनसे कार्यकर्ते टोळवर असलेल्या कर्मचाऱ्यांना जाब विचारत होते. ऐवढं ट्राफीक जाम असताना ही कसला टोल वसूल करता असं ते त्यांना विचारत होते. पण आम्ही सर्व काही सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहोत असं ते सांगत होते. यावेळी टोलनाक्यावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक गाड्या पुढे सरकल्या होत्या. 

नक्की वाचा - Shocking news: खड्ड्याने 6 वर्षाच्या चिमुकलीचा जीव घेतला!, खेळता खेळता घात झाला, जबाबदार कोण?

मनसे कार्यकर्त्यांना यावेळी अडवण्याचा प्रयत्न झाला. पण ते आक्रमक होते. लोकांना होणाऱ्या त्रासाचे टोलवाल्यांना काही पडले आहे का असा प्रश्न ते करत होते. शिवाय त्यांनी टोलमुळे किती मोठी रांग लागली आहे हे दाखवले. शिवाय या वाहतूक कोंडीत रुग्णवाहीका ही अडकल्याचे दाखवून दिले. वारंवार या गोष्टी होत असल्यामुळे हे आंदोलन केल्याचे मनसेने स्पष्ट केले.या घटनेमुळे जुना पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक काही वेळ पूर्णपणे विस्कळीत झाली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू होती.