पोर्शे कार अपघात: रक्ताचे नमुने बदलण्यासाठी 50 लाखाचा व्यवहार, माजी पोलिस अधिकाऱ्याचाही फोन

अपघात झाल्यानंतर अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. हे रक्ताचे नमुने बदलण्यासाठी तब्बल 50 लाखाचा व्यवहार झाला होता.

Advertisement
Read Time: 2 mins
पुणे:

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात आता एकामागून एक धक्कादायक खुलासे पुढे येत आहेत. अपघात झाल्यानंतर अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. हे रक्ताचे नमुने बदलण्यासाठी तब्बल 50 लाखाचा व्यवहार झाला होता. त्यासाठी वॉट्सअप कॉलवर डिल करण्यात आले होते. हा कॉल डॉक्टर अजय तावरे आणि विशाल अगरवाल यांच्यात झाल्याची माहिती आता चौकशीत उघड झाली आहे. विशेष म्हणजे एका माजी पोलीस अधिकाऱ्यानेही या प्रकरणात हस्तक्षेप करत बचावासाठी प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
  
भरधाव पोर्शेकारने दोघांना चिरडले. त्यावेळी अल्पवयीन तरूण हा मद्यधुंद अवस्थेत होता. त्याच्या रक्ताच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली. हे नमुने बदलले जावेत यासाठी त्याच वेळी मोठी डिल करण्यात आली होती. त्यासाठी अल्पवयीन मुलाचा बाप विशाल अगरवार याने डॉक्टर अजय तावरे यांना संपर्क केला होता. तब्बल 15 वेळा या दोघांमध्ये वॉट्सअप संभाषण झाले होते. त्यात 50 लाखांचा व्यवहार या दोघांमध्ये ठरला. त्यानुसार तावरे यांचा सहाय्यक श्रीहरी  हर्नोल याकडे पहिला हप्ता देण्यास सांगण्यात आले. त्यानुसार हर्नोल याच्याकडे अडीच लाख कॅश पोचती करण्यात आली. तर शिपाई अतुल घटकांबळे याच्याकडे पन्नास हजाराची रोख रक्कम देण्यात आली. हर्नोल याच्या चौकशीत या बाबी उघड झाल्या आहेत. 

Advertisement

हेही वाचा -  पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपीचे महाबळेश्वर कनेक्शन, नियमच धाब्यावर बसवले

एकीकडे रक्ताचे नुमने बदलण्यासाठी अनेक घडामोडी घडत होत्या. त्याच वेळी एक माजी पोलीस अधिकारीही या बिल्डर पुत्राला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होता. त्याने त्याला वाचवण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकला होता. तसा फोनही त्याने येरवडा पोलीस स्थानकात त्यारात्री केला होता. चौकशी दरम्यान ही माहिती समोर आली आहे. दरम्यान अपघात झालेल्या पोर्शे कारची नोंदणी रद्द करण्यात आली आहे.  

Advertisement

हेही वाचा - गोळीबारच्या घटनेमुळे भुसावळ हादरलं, माजी नगरसेवकासह दोघांची हत्या

पुण्यात 19 मे ला रात्री उशीरा भरधाव पोर्शे कारने दोघांना जोरदार धडक दिली होती. त्यात अनिश अवधिया आणि आश्विनी कोष्टा या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर आरोपी हा अल्पवयीन असल्याने गभीर गुन्हा करूनही त्याला तातडीने जामीनही मिळाला होता. मात्र यावर सर्वच स्तरातून टिका झाल्यानंतर सुत्र फिरली, आणि एका पाठोपाठ एक अटक सत्र सुरू झाले. यात आता अल्वयीन तरूणासह त्याचे वडील विशाल अगरवाल, त्यांचे अजोबा, रक्ताच्या नुमन्यात फेरफार करणारे डॉक्टर हे आता पोलिसांच्या ताब्यात आहे. 

Advertisement