जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे येथे 13 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता, "प्लेसमेंट ड्राइव्ह"चे आयोजन करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी क्रांतिकारक लहुजी साळवे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औद्योगिक वसाहत, नांगरगाव, लोणवाळा येथेही प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यामध्ये सहभागी होण्याकरिता इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नक्की वाचा - Mumbai News: दहिहंडी सराव जीवावर बेतला, 11 वर्षीय मुलाचा 6 व्या थरावरून कोसळून मृत्यू
कौशल्य विकास विभागाच्या वेबसाईटवरून रिक्त पदांना ऑनलाइन अॅप्लाय करणे आवश्यक आहे. खाजगी क्षेत्रातील विविध रिक्तपदांकरिता प्लेसमेंट ड्राइव्हच्या ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखत (Walk-in-Interview) घेण्यात येणार आहे. याकरिता नोकरीइच्छूक उमेदवारांनी विहीत दिनांकास प्लेसमेंट ड्राइव्हच्या ठिकाणी उपस्थित राहणे, तसेच मुलाखतीस येताना आपल्या सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती, पासपोर्ट साईज फोटो, आवश्यकतेनुसार बायोडाटा अर्जाच्या (Resume) प्रती सोबत आणणे गरजेचे आहे.
अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे, 481 रास्ता पेठ, पुणे येथे कार्यालयीन वेळेमध्ये प्रत्यक्ष अथवा 020 26133606 या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन सा.बा.मोहिते, प्र.सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांनी केले आहे. संधीचा सर्वच बेरोजगार तरुणांनी लाभ घ्यावा असं सांगण्यात आलं आहे.